रानडुकराची शिकार करणाऱ्या १२ जणांवर वनविभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:28+5:302021-07-30T04:40:28+5:30
वाई : वाई वनविभागाने रानडुकराची शिकार करणाऱ्या टोळीवर कारवाई करून जेरबंद केले व साडेतीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...
वाई : वाई वनविभागाने रानडुकराची शिकार करणाऱ्या टोळीवर कारवाई करून जेरबंद केले व साडेतीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
वाई वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार वाई वनपरिक्षेत्राचे अधिकारी कर्मचारी यांना मौजे बावधन गावचे हद्दीत गस्त करीत असताना रास्ते मळा शेजारी महादेव परिसर आवारात धोम उजव्या कालव्यावर पिकअप (एमएच ४५ एएफ २९३२) वाहन संशयित मिळून आले. या वाहनाची तपासणी केली असता रामचंद्र लक्ष्मण वाघमोडे (वय ५०), सुरेश रामा जाधव (१८), तात्या रामा जाधव (२२), तानाजी शंकर पवार (४८), सुरेश पवार (२०), शिवाजी रामा पवार (२५), तानाजी शिवाजी वाघमोडे (२३), मोतीराम रामचंद्र शिंदे (२६), तात्याबा रामा पवार (३३), रामचंद्र शिवजी वाघमोडे (२५), रामचंद्र व्यंकू पवार (२८), रामदास मधुकर जाधव (२७, सर्व जण हल्ली राहणार नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वनपरिक्षेत्र महेश झांजुर्णे, वनपाल सुरेश पटकारे, वनपाल रत्नकांत शिंदे, वनरक्षक वैभव शिंदे, वनरक्षक सुरेश सूर्यवंशी, वसंत गवारी, अजित पाटील, प्रदीप जोशी, संदीप पवार, अश्विनी करडे, वनसेवक संजय चव्हाण, सुरेश सपकाळ, महेंद्र मोरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.