काळगावचा वणवा थेट जंगलात घुसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:14+5:302021-02-16T04:39:14+5:30
वणव्याचे ग्रहण दूर करण्यासाठी वनविभागाने जागृतीबरोबरच कारवाईची मोहीम गतिमान केली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास काळगावच्या ...
वणव्याचे ग्रहण दूर करण्यासाठी वनविभागाने जागृतीबरोबरच कारवाईची मोहीम गतिमान केली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास काळगावच्या अंबारी भागातील वनहद्दीलगतच्या फार्महाऊस परिसरात दोघांनी आग लावली होती. वाळलेले गवत व वारा यामुळे क्षणात आग फैलावली. यात जंगल कक्ष क्रमांक ६२२ मध्ये आग लागली. त्यामध्ये साडेपाच हेक्टर परिसरात असलेल्या आकेशिया, साग, आवळा यासह लहान झाडे-झुडपे, पालापाचोळा, गवत जळून खाक झाले. परिसरामध्ये कार्यरत असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदविला असून, लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वणवा विझविण्यासाठी वनकर्मचारी व ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त केली. ब्लोअर मशीन व झाडांच्या डहाळ्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. सुदैवाने पुढील हानी टळली.