सवयभानचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:44 AM2021-09-21T04:44:56+5:302021-09-21T04:44:56+5:30
सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत होती. मात्र, साधारणत: एक महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या शंभर ते ...
सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत होती. मात्र, साधारणत: एक महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या शंभर ते चारशेच्या घरात आहेत, तर मृतांचा आकडा खूपच खाली आला आहे; पण यामुळे कोरोना संपला असे म्हणता येणार नाही. तरीही अनेक सातारकर मास्कचा वापर करत नाहीत. गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा सामाजिक कार्यातून एक गाडी मास्कचा वापर करण्याबाबत सवयभानची आठवण करून दिली जात होती; पण आता नागरिकांना सवयभानचा विसर पडला आहे.
००००
साताऱ्यातील रस्ते रात्री उशिरापर्यंत गजबजलेले
सातारा : कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन अनेक प्रकारे नियोजन करत आहे. रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली होती. गेल्या वर्षी गणेशोत्सवात पूर्णपणे संचारबंदी लागू केली होती. यंदा मात्र कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झालेले असल्याने सातारकर बिनधास्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना नव्हता तेव्हा ज्या पद्धतीने लोकांची दिवसभर गर्दी असायची, त्याच पद्धतीने आताही साताऱ्यातील रस्ते पूर्णपणे गजबजलेले असतात. राजवाडा परिसरातील खाद्यपदार्थांचे गाडे, आइस्क्रीम विक्रीच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोसायट्यांमध्ये गरज
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यातील असंख्य वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, रखवालदार नाही. त्यामुळे कोणी आले तर विचारणा होत नाही; पण काही सोसायटीत कसलीही खबरदारी घेतली गेलेली नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेस काही नागरिकांचा वावर वाढला आहे. अशांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, तर ज्या सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा ठिकाणाहून पेट्रोल, डिझेलची चोरी वाढत आहे.
रस्त्यावर वाहनतळ
सातारा : साताऱ्यापासून करंजे परिसरातील रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे संबंधितांनी योग्य त्या ठिकाणी वाहने उभी करावीत, अशी मागणी होत आहे.
चौकात पुन्हा गर्दी
सातारा : कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांतून बिनधास्तपणा वाढला आहे; पण त्याचवेळी दररोज सायंकाळी अकरा वाजून गेले तरी असंख्य सातारकर चौकामध्ये आइस्क्रीम खाण्यासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.