ब्रेक लागलेल्या खासगी प्रवासी गाड्यात सॅनिटायझरचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:36 AM2021-05-17T04:36:57+5:302021-05-17T04:36:57+5:30

सातारा : कोरोनाने शिरकाव केल्यापासून गेल्या वर्षी सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद केली होती. आताही ती बंद करण्यात आली होती. ...

Forget sanitizer in braked private passenger car | ब्रेक लागलेल्या खासगी प्रवासी गाड्यात सॅनिटायझरचा विसर

ब्रेक लागलेल्या खासगी प्रवासी गाड्यात सॅनिटायझरचा विसर

Next

सातारा : कोरोनाने शिरकाव केल्यापासून गेल्या वर्षी सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद केली होती. आताही ती बंद करण्यात आली होती. तेव्हा कडक अंमलबजावणी करण्यात येत होती. आता दुसऱ्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातून वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी गाड्यांची संख्या अत्यल्प असली तरी त्यामध्ये सॅनिटायझरचा विसर पडत असल्याचे चित्र आहे. तसेच मास्क वापरण्याबाबतही सक्ती केली जात नाही.

जिल्ह्यात साधारणत: मार्चपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली. एप्रिल महिन्यात तर दररोज सरासरी दोन हजार रुग्णसंख्या वाढत होते. त्यामुळे कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. तरीही रुग्णसंख्या कमी होत नाहीत. त्यामुळे प्रवासी वाहतूक बंद करून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाका तयार केले आहेत. त्यामुळे प्रवास करणे कमीच झाले आहे. तरीही अत्यावश्यक काम असेल तर खासगी प्रवासी बसने जाण्याचा मार्ग निवडला जातो.

सातारा जिल्ह्यातून पुणे, मुंबईला दर पंधरा मिनिटांनी एसटीच्या फेऱ्या असतात. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक या मार्गावर कमी प्रमाणात चालते. मात्र सध्या प्रवासी संख्याच कमी असल्याने एसटीची चाकं एकाच ठिकाणी थांबली आहेत. या उलट खासगी प्रवासी व्यावसायिकांचाही व्यवसाय ठप्प आहे. बँकांचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे खासगी व्यावसायिक रात्रीच्या वेळी मिळेल तसे फेऱ्या करत आहेत. ही संख्या जिल्ह्यातून खूपच कमी असली तरी कोल्हापूर, सांगली, गोवा व कर्नाटकातून येणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. त्यांचाच आधार सातारकरांना होत आहे. मात्र काळजी घेतली जात नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.

अशी आहेत आकडेवारी

रोज जाणाऱ्या सरासरी ट्रॅव्हल्स

रोज शहरात येणाऱ्या सरासरी ट्रॅव्हल्स

६०

सरासरी प्रवासीसंख्या

चौकट

प्रवासीच मारतात सॅनिटायझर

खासगी प्रवासी चालक व त्यांचे सहायक प्रवाशांना गाडी बाहेर काढताना निर्जंतुक केली जात असल्याचे सांगत असले तरी तसे होत नाही. तसेच आत आल्यानंतर प्रवाशांसाठी सॅनिटायरची सोय केलेली नसते. प्रवासीच स्वत: आसनस्थ होण्यापूर्वी स्वत: आणलेले सॅनिटायझर सीट, हॅण्डलवर मारत असतात.

चौकट :

ई-पास ना चौकशी

या काळात जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पास सक्तीचा केला आहे. मात्र कोणाकडेही प्रवासी वाहतूकदार चौकशी करत नाहीत. मात्र गाडीत बसण्यापूर्वी गाडी चेक होईल.. याची आठवण करून देतात. पण शक्यतो रात्रीच्या वेळी प्रवास करत असल्याने प्रवासी अडचणीत येणार नाहीत, याचीही काळजी घेतात.

चौकट

रोज सरासरी वीस कारवाई

सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ व कऱ्हाडजवळ तपासणी पथके तैनात केले आहेत. ते रात्रंदिवस तपासणी करत आहेत. यामधून दररोज सरासरी पंधरा ते वीस वाहनांवर कारवाई केली जाते. यामध्ये ई-पास, प्रवासी संख्येबरोबरच प्रादेशिक वाहनांच्या नियमांचा भंग केला असल्यास ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.

Web Title: Forget sanitizer in braked private passenger car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.