मंत्री गोरे खंडणीप्रकरणी शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:04 IST2025-04-08T13:03:38+5:302025-04-08T13:04:03+5:30
दहिवडी : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणीप्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तसेच दहिवडीचे माजी नगरसेवक अजित ...

मंत्री गोरे खंडणीप्रकरणी शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
दहिवडी : ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांच्या खंडणीप्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तसेच दहिवडीचे माजी नगरसेवक अजित पवार यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना दहिवडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर अजित पवार यांना अटक केल्याने या गुन्ह्याची व्याप्ती वाढत चालली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. तसेच याप्रकरणात तुषार खरात यांना मुंबईतून अटकही करण्यात आली होती. तर सातारा येथेही एका महिलेला खंडणीप्रकरणी अटक झालेली आहे.
त्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला. तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अनिल सुभेदार यांनाही पोलिसांनी अटक केली. तर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे समर्थक, माजी नगरसेवक अजित पवार यांना दहिवडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चाैकशीनंतर त्यांना अटकही करण्यात आली. यामुळे माण तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सहभाग असल्याचे निष्पन्न..
या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक झाली होती. आता अजित पवार यांच्यामुळे अटक झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. याप्रकरणाचा तपास म्हसवडचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत. अजित पवार यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळला, काही माहिती हाती आली, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना दहिवडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी दिली आहे.