कृष्णाचे माजी संचालक पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: April 15, 2017 01:54 PM2017-04-15T13:54:21+5:302017-04-15T13:54:21+5:30
माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील अटकेत असतानाच शनिवारी या प्रकरणात माजी संचालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
कऱ्हाड, दि. 15 - बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील अटकेत असतानाच शनिवारी या प्रकरणात माजी संचालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या संचालकांवर दुपारपर्यंत अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार आठ महिन्यांपूर्वी उघडकीस आला आहे. याबाबत ऊसतोडणी वाहतूकदार यशवंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. कृष्णा कारखान्याच्या २०१४-१५ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना प्रत्येकी ७ लाखांप्रमाणे परतफेड करण्याची नोटीस बँक आॅफ इंडियाकडून पाठविण्यात आली होती. तांबवे येथील वाहतूकदार यशवंत पाटील यांनाही ही नोटीस २६ नोव्हेंबर २०१५ रोजी मिळाली. नोटीस मिळाल्यानंतर यशवंत पाटील यांच्यासह अन्य ऊस वाहतूकदारांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या नावे कर्ज प्रकरण असल्याचे समोर आले.
संबंधित शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची तसेच त्यांची वैयक्तिक कागदपत्रे कारखान्याकडे दिली होती. मात्र, त्या हंगामात संबंधित वाहतूकदारांना करारानुसार ठरलेली उचल न मिळाल्याने संबंधित वाहनधारकांनी तोडणी वाहतुकीसाठी आपले वाहन लावले नाही. तरीही या वाहतूकदारांच्या नावे प्रत्येकी सात लाखांचे कर्ज उचलण्यात आल्याचे बँकेच्या नोटिसीनंतर समोर आले. या प्रकरणात १४ फेब्रुवारी रोजी अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना अटक करण्यात आली. सध्या ते दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.