सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दादाराजे खर्डेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 12:30 PM2019-08-16T12:30:32+5:302019-08-16T18:55:38+5:30
सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जेष्ठ संचालक यशंवतराव उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर जहागीरदार आप्पासाहेब निंबाळकर (खर्डेकर) यांचे ते नातू होत.
सातारा : सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जेष्ठ संचालक यशंवतराव उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर जहागीरदार आप्पासाहेब निंबाळकर (खर्डेकर) यांचे ते नातू होत.
अंत्यसंस्कार सायंकाळी 5.00 वा आसू ता फलटण येथे होणार आहे. पंचायत समितीचे उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचे ते वडील आणि साताराचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मामा होत. दादाराजे हे शिवेंद्रराजेंचे सासरेही लागतात.
श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांनी जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळात अनेक वर्षेे काम केल्यानंतर या कामाची पोहोचपावती म्हणून शरद पवार आणि श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्यावर या बॅंकेच्या चेअरमनपदाची जबाबदारी सोपविली होती.
आजच्या राजकारण आणि समाजकारणात ज्यांच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घ्यावेत, अशी मोजकी व्यक्तिमत्त्वे शिल्लक असून त्यापैकी श्रीमंत दादाराजे खर्डेकर हे एक संयमी, स्वच्छ चारित्र्याचे, निगर्वी आणि निस्वार्थी व्यक्तिमत्त्व होते.
आपण राजकारणात अनेकांच्या बरोबर राहिलो, अनेकांना राजकीयदृष्ट्या योग्य सहकार्य केले. मात्र आमच्या अडचणीच्या काळात श्रीमंत दादाराजे खर्डेकरांनी आपल्याला केलेली मदत, ठामपणे पाठीशी उभा राहून दिलेली ताकद निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिक्रिया हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी दिली.