सातारा: सज्जनगडावरील तटबंदी ढासळली, तत्काळ दुरुस्तीची दुर्गप्रेमीकडून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 07:44 PM2022-07-21T19:44:42+5:302022-07-21T19:45:36+5:30

परळी : किल्ले सज्जन गडावर गेल्या चार वर्षांपूर्वी पहिल्या महाद्वारानजीक असलेल्या बुरुजाचा काही भाग अतिवृष्टीमध्ये ढासळला होता. तर आता ...

Fortification at Sajjangad has collapsed, demand for immediate repair from Fort enthusiasts | सातारा: सज्जनगडावरील तटबंदी ढासळली, तत्काळ दुरुस्तीची दुर्गप्रेमीकडून मागणी

सातारा: सज्जनगडावरील तटबंदी ढासळली, तत्काळ दुरुस्तीची दुर्गप्रेमीकडून मागणी

googlenewsNext

परळी : किल्ले सज्जनगडावर गेल्या चार वर्षांपूर्वी पहिल्या महाद्वारानजीक असलेल्या बुरुजाचा काही भाग अतिवृष्टीमध्ये ढासळला होता. तर आता समर्थ महाद्वाराच्या वरील बाजूस असलेल्या पायरी मार्गावरील तटबंदीचा भाग ढासळला आहे. किल्ले सज्जनगडावर प्रशासनाने गडावरील दोन्ही संस्थांनी मिळून या ढासळलेल्या तटबंदीची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी दुर्गप्रेमी व समर्थ भक्तांमधून होत आहे.

परळी खोऱ्यातील इतिहासाची साक्ष असलेला किल्ले सज्जनगड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून गडावर चांगलाच पाऊस झाल्याने पावसाचे पाणी तटामध्ये मुरून तटबंदी पडली आहे. सज्जनगडावर बुरुज तटबंदी पायरी मार्ग यांचे जतन होणे गरजेचे आहे. सज्जनगड संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले पाहिजे.

Web Title: Fortification at Sajjangad has collapsed, demand for immediate repair from Fort enthusiasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.