मलकापुरात हरकतींचा पंधरवडा

By Admin | Published: December 21, 2014 12:31 AM2014-12-21T00:31:08+5:302014-12-21T00:37:43+5:30

नगरपंचायतीत झुंबड : करवाढीवर २५ तर आरक्षणांवर २७ डिसेंबर अंतिम मुदत, नागरिक संभ्रमात

Fortnight of obituaries in Malkapur | मलकापुरात हरकतींचा पंधरवडा

मलकापुरात हरकतींचा पंधरवडा

googlenewsNext

मलकापूर : मलकापुरात सध्या करवाढ व शहर विकास आराखड्यातील आरक्षणे हे दोन मुद्दे नागरिकांच्या दृृष्टीने जिव्हाळ्याचे बनले आहेत़ करवाढीवर हरकती दाखल करण्यासाठी २५ तर आरक्षणांवर हरकती दाखल करण्यासाठी २७ डिसेंबर ही अंतिम मुदत असल्यामुळे मलकापुरात हरकतींचा पंधरवाडा साजरा होत आहे़ काम धंदा सोडून सध्या हरकती दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे़
मलकापूर नगरपंचायतीने गेल्या सहा वर्षांत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवित आपले नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे़ सोयी-सुविधांच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या मलकापुरात सध्या संकलित करवाढ लागू केली आहे़ त्यामुळे नागरिकांना दुप्पट ते चौपट कराची नोटीस मिळाली आहे़ या नवीन पद्धतीच्या करवाढीवर हरकती दाखल करण्यासाठी २५ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे़
अव्वाच्या सव्वा कराची रक्कम पाहून सर्वच नागरिकांची झोप उडाली आहे़ या निर्णयाच्या विरोधात हरकती दाखल करण्यासाठी शिवसेनेसह विविध संघटनांनी व नागरिकांनी कंबर कसली आह़े़ नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये हरकती दाखल करण्यासाठी चांगलीच गर्दी होत आहे़ आलेल्या हरकतींवर २६ ते ३० या कालावधीत सुनावणी होणार असल्याचे नियोजन नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे़
त्याचबरोबर शहराचा सुधारित शहर विकास आराखडा ५७ आरक्षणांसह प्रसिद्ध झाला आहे़ या आरक्षणांवर हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत २७ डिसेंबर ठेवण्यात आली आहे़ ज्यांच्या शेतीवर आरक्षणे निर्देशित केली आहेत़ अशा नागरिकांना या आरक्षणांच्या हरकती दाखल करावयाच्या आहेत़ त्याचीही सध्या गडबड सुरू आहे़ त्यामुळे मलकापुरात सध्या हरकतींचाच पंधरवाडा सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Fortnight of obituaries in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.