फाउंटनचा बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:48+5:302021-01-16T04:42:48+5:30
मलकापूर : आगाशिव डोंगर हा पर्यटन केंद्र ठरत आहे. विविध रंगांची फुले, झाडे व वन्यप्राण्यांच्या वास्तव्याने पर्यटनाचे आकर्षण वाढले ...
मलकापूर : आगाशिव डोंगर हा पर्यटन केंद्र ठरत आहे. विविध रंगांची फुले, झाडे व वन्यप्राण्यांच्या वास्तव्याने पर्यटनाचे आकर्षण वाढले आहे. सध्या डोंगरावरील गुलाबी फाउंटन या गवताचा बहर वाढल्यामुळे गुलाबी थंडीत निसर्गाची गुलाबी उधळण होत आहे. हे निसर्गाचे नयनरम्य रूप पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
श्वानांची दहशत (फोटो : १५इन्फोबॉक्स०२)
कऱ्हाड : तालुक्यातील विंग व परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट श्वानांची दहशत वाढली आहे. श्वानांची संख्या जास्त असून, ते रात्रीच्या वेळी दुचाकीचालकांवर हल्ला करत आहेत. अचानक गाडीवर हल्ला केल्याने अपघात होत आहेत. श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
पालिकेचा वॉच
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास दंड केला जात आहे. पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, कारवाईसाठी एक पथकही स्थापन केले आहे. या पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवला जात आहे. संबंधिताना पकडून त्यांना दंडही केला जात आहे.
मल्हारपेठला गर्दी
मल्हारपेठ : मल्हारपेठ ही पाटण तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. याठिकाणी कपडे तसेच सोन्या-चांदीची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या लग्नसराईमुळे विभागातील अनेक गावांतील ग्रामस्थ बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. ग्राहकांच्या गर्दीमुळे बाजारपेठा गजबजल्याचे दिसून येत आहे.