उपळवे कारखान्यातील साहित्य चोरीप्रकरणी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:36+5:302021-03-13T05:12:36+5:30
फलटण : स्वराज साखर कारखाना उपळवे (ता. फलटण) येथील स्टोअर रूममधील चोरीस गेलेला ३ लाख १४ हजार ७५२ रुपयांच्या ...
फलटण : स्वराज साखर कारखाना उपळवे (ता. फलटण) येथील स्टोअर रूममधील चोरीस गेलेला ३ लाख १४ हजार ७५२ रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीस ४८ तासांच्या आत फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ८ मार्च रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली होती.
विक्रम गणेश जगदाळे (वय २३, रा. सावंतवाडी ता. फलटण, जि. सातारा), शशिकांत विष्णू कदम (३०, रा. दऱ्याचीवाडी, ता. फलटण), अक्षय रामचंद्र जाधव (२३, रा. श्रीरामनगर उपळवे, ता. फलटण), अमोल अरविंद शिंदे (४२, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या चोरीप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यू. एस. शेख यांनी गुन्ह्याचा तपास करून व गोपनीय माहितीवरून गुन्ह्यातील वरील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन, या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेला एकूण ३ लाख १४ हजार ७५२ रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित आरोपींकडून हस्तगत करण्यात आला.