सव्वा चारशे कर्मचाºयांनी घेतले निवडणुकीचे धडे-दहा कर्मचारी गैरहजर : फलटणमध्ये प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 01:09 PM2019-04-03T13:09:52+5:302019-04-03T16:10:53+5:30
मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी ८७७ केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाºयांचे पहिले प्रक्षिण फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनमध्ये पार पडले. यामध्ये ४१९ कर्मचाºयांना निवडणूक प्रक्रियेचे धडे देण्यात आले.
फलटण -मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी ८७७ केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाºयांचे पहिले प्रक्षिण फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनमध्ये पार पडले. यामध्ये ४१९ कर्मचाºयांना निवडणूक प्रक्रियेचे धडे देण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी आर. टी. शिंदे, संतोष जाधव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार हनुमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सोळा कर्मचारी गैरहजर राहिले. तसेच दुसºया सत्रात ४३२ कर्मचाºयांनी उपस्थिती लावली.
प्रशिक्षणात कर्मचाºयांना इव्हीएम मशीनबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर इव्हीएम मशीन प्रिप्रेशन करणे, व्हीव्हीपॅटबाबत माहिती देण्यात आली. इव्हीएम मशीन प्रत्यक्ष हाताळणीबाबत हणमंतराव पवार हायस्कूल येथे प्रशिक्षण देण्यात आले. यापूर्वी निवडणूक पूर्व कामासाठी ५२ कर्मचाºयांची निवड करण्यात आली. नेमणूक पत्र देऊनही सदर कामास तीन कर्मचारी गैरहजर राहिले.
फलटण तालुका व शहरातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी मतदान जनजागृती मोहीम कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. राष्ट्रीय महोत्सव सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यात मतदान करण्याची संधी गमावू नका असा संदेश या कार्यक्रमात देण्यात येत आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, तहसीलदार हणुमंत पाटील, नायब तहसीलदार अनंत गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू आहेत.
उपस्थित कर्मचाºयांना नोटीसा
निवडणूक कामासाठी नेमलेले तीस निवडणूक कर्मचारी गैरहजर आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणास व मतदान पूर्व कामास गैरहजर राहणाºया कर्मचाºयांना नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत. हजर न होणाºया कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.