सात वर्षांतील बी फार्मसीच्या चारशे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:22 PM2017-10-24T17:22:12+5:302017-10-24T17:29:54+5:30
सातारा येथील गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या बी. फार्मसीमधील सात वर्षांतील सुमारे चारशे विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर आलेले अनुभव एकमेकांना सांगितले. नोकरीनिमित्ताने आपापल्या मार्गाने गेलेल्यांना पुन्हा भेटण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी संस्थेचे आभार मानले.
सातारा , दि. २४ : येथील गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या बी. फार्मसीमधील सात वर्षांतील सुमारे चारशे विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर आलेले अनुभव एकमेकांना सांगितले. नोकरीनिमित्ताने आपापल्या मार्गाने गेलेल्यांना पुन्हा भेटण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी संस्थेचे आभार मानले.
माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थेचे चेअरमन मदनराव जगताप म्हणाले, गौरीशंकरच्या माजी विद्यार्थ्यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संस्थेच्या प्रगतीसाठी अनमोल साथ दिली आहे.
यामुळेच अल्पावधित गौरीशंकरने शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमठविला. माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन महाविद्यालय व संस्थेबद्दलची दाखविलेली आपुलकी कौतुकास्पद आहे़ हे ऋणानुबंधाचे नाते संस्था कायम स्वरुपी जोपासेल.
स्नेहमेळाव्याचे दीपप्रज्वलन माजी विद्यार्थ्यांनी मोनिका कुंभार हिच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ़ अधिकराव यादव, उपप्राचार्य योगेष गुरव उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सोहेल शेख, पदाधिकारी अमोल यादव, आकाश माळी, सूरज सोनमाळे, पंकज लाडे, वैभव खाडे, रोहन यमगार यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ़ अधिकराव यादव म्हणाले, विद्यार्थ्यांचे हित जोपासत दिलेले ज्ञानदान विद्यार्थ्यांच्या उज्वल करिअरसाठी पूरक ठरल्याचा आनंद होत आहे. माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाशी यापुढील काळातील संबंध उत्तम राहतील. यासाठी महाविद्यालयस्तरावर विषेश उपक्रम राबविले जातील.
श्रीरंग काटेकर म्हणाले, स्नेह, आपुलकी, जिव्हाळा जोपासणाऱ्या गौरीशंकरने नेहमीच विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली स्वीकारली. त्याचेचे प्रतिबिंब माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात दिसून येते.
प्रा़ चेतना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य योगेश गुरव यांनी आभार मानले. यावेळी प्रा़ डी़ एम़ घाडगे, प्रा. स्फुर्ती साखरे, प्रशांत शेडगे, संजय देशमाने, आर. एल. जाधव उपस्थित होते.
ऋणानुबंध जपू या, गौरीशंकरचा उत्कर्ष साधू या, असा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. असंख्य विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत सुख, दु:ख प्रत्येक क्षण येथे अनुभवले.
दीपोत्सवाचा फराळ
गौरीशंकर शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना लोकमत दीपोत्सव भेट देऊन दिवाळीचा अनोखा फराळच दिला. विद्यार्थांनीही या दीपोत्सवातील विषय भावी आयुष्यात उपयोगी पडतील, अशा भावना व्यक्त केल्या.