Accident: इस्लामपूर जवळ तिहेरी अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 04:17 PM2022-03-26T16:17:42+5:302022-03-26T20:12:13+5:30

नातेवाईकांकडे वास्तुशांती समारंभासाठी निघाले असता पोळ कुटुंबीयावर काळाने घाला घातला.

Four killed in car accident near Islampur, Dead in Karad taluka | Accident: इस्लामपूर जवळ तिहेरी अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार

Accident: इस्लामपूर जवळ तिहेरी अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार

googlenewsNext

मलकापूर : समोरील कारने अचानक ब्रेक लावल्याने कार थांबण्याचा प्रयत्न करत असतानाच पाठीमागून डंपरने कारला जोराची धडक दिली. इस्लामपूर जवळ झालेल्या या तिहेरी अपघात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर सात वर्षाच्या चिमुकलीसह एक महिला गंभीर जखमी झाली.

अपघात मृत झालेले कराड तालुक्यातील आगाशिवनगर, मलकापूर येथील आहेत. नातेवाईकांकडे वास्तुशांती समारंभासाठी निघाले असता पोळ कुटुंबीयावर काळाने घाला घातला. या अपघाताची माहिती मिळताच आगाशिवनगरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

कार चालक  अधिकराव जगन्नाथ पोळ (वय ४९), आई  गिताबाई जगन्नाथ पोळ (७०), पत्नी  सुषमा अधिकराव पोळ हे तिघे मृत झाले. तर, भावजय  सरीता सुभाष पोळ (३५) व भावाची मुलगी  समृद्धी सुभाष पोळ (७, सर्व रा. पोळवस्ती, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की, आगाशिवनगर येथील पोळ कुटुंबीय नातेवाईकाच्या घरांच्या वास्तुशांती समारंभासाठी आज सकाळी कारमधून सांगलीकडे निघाले होते. यावेळी अधिकराव पोळ यांच्यासह त्यांची पत्नी, आई, पुतणी व भाऊजी असे पाच जण कार मधून निघाले होते. ते पेठ नाका ते इस्लामपूर मार्गे सांगलीकडे जात असताना इस्लामपूर जवळ समोरील कार चालकाने अचानक ब्रेक मारला. यावेळी पोळ यांनीही त्वरित ब्रेक मारून आपली कार थांबवण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघे ठार झाले. तर चिमुकलीसह महिला गंभीर जखमी झाली. जखमींवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आगाशिवनगरमधील अधिकराव पोळ यांचे इतर नातेवाईक, कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालयांमध्येही नातेवाईकांसह मित्रपरिवाराने गर्दी केली होती. या घटनेमुळे आगाशिवनगरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Four killed in car accident near Islampur, Dead in Karad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.