स्वच्छतेसाठी चार लाख विद्यार्थ्यांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 03:02 PM2017-09-29T15:02:50+5:302017-09-29T15:03:00+5:30

सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. विद्यार्थ्यांनी चक्क रांगा लावून मतदान केले.

Four lakh students polled for cleanliness | स्वच्छतेसाठी चार लाख विद्यार्थ्यांनी केले मतदान

स्वच्छतेसाठी चार लाख विद्यार्थ्यांनी केले मतदान

Next
ठळक मुद्देरांगा लागल्या : २ हजार ७७३ प्राथमिक शाळा व ७४४ हायस्कूल-महाविद्यालयांमध्ये अनोखा उपक्रम

सातारा : जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. विद्यार्थ्यांनी चक्क रांगा लावून मतदान केले.
 शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत मतदान घेण्यात आले. स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील २ हजार ७७३ प्राथमिक शाळांमधील १ लाख ४७ हजार ७५७ व ७४४, महाविद्यालयांमध्ये २ लाख ४७ हजार ८३८ विद्यार्थी असून, एकूण ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थी सहभागी झाले. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देऊन मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मतपत्रिका, मतपेटी बॉक्स, काळ्या शाईचा परमनंट मार्कर, विद्यार्थी मतदार यादी आदी शिक्षक उपलब्ध केले. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सर्व विद्यार्थ्यांचे मतदान झाल्यानंतर मतदान पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे स्वच्छतेविषयी नेमकी जागृती करणे सोपे झाले. 
मतदानानंतर शिक्षकांनी मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केल्याची निशाणी लावलेल्या बोटांसह फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर टाकले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण सभापती राजेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला.
हा झाला फायदा
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती झाली. अनेकदा पालक घरात सांगत असतात, पण मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र मतदानाच्या निमित्ताने मुलांना हो किंवा नाही अशी उत्तरे द्यावी लागली असल्याने त्यांच्या मनाची तयारी झाली. 
या प्रश्नांची उत्तरे मिळाली
-घरामध्ये वैयक्तिक शौचालय आहे का
- जेवणापूर्वी हात धुता का?
-शौचास जाऊन आल्यावर हात धुता का?
- पिण्याचे पाणी कसे घेता?

Web Title: Four lakh students polled for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.