चार नगराध्यक्ष बिनविरोध

By admin | Published: July 10, 2014 12:35 AM2014-07-10T00:35:20+5:302014-07-10T00:35:34+5:30

राजकारण तापले : सातारा, फलटण, म्हसवड, रहिमतपूरमध्ये एकच अर्ज

Four Municipal Chief Unions | चार नगराध्यक्ष बिनविरोध

चार नगराध्यक्ष बिनविरोध

Next

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगराध्यक्ष निवडीमुळे जिल्ह्यातील राजकारण भलतेच तापले आहे. सातारा, फलटण, म्हसवड व रहिमतपूरमध्ये नगराध्यक्षपद बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश मिळाले आहे, तर वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कऱ्हाड पालिकांच्या नगराध्यक्ष निवडीत एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण झाली आहे.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण बदलले असल्याने या निवडी कराव्या लागल्या आहेत. सचिन सारस (सातारा), उज्ज्वला माने (रहिमतपूर), विजय सिन्हा (म्हसवड), सारिका जाधव (फलटण) यांचा त्या-त्या ठिकाणी एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची नगराध्यक्षपदावरील निवड निश्चित झाली आहे.
याउलट कऱ्हाडमध्ये सत्ताधारी लोकशाही आघाडीच्या विद्याराणी साळुंखे व विरोधी जनशक्ती आघाडीच्या अरुणा शिंदे यांचे अर्ज दाखल झाले. महाबळेश्वरमधून लोकमित्र जनसेवा आघाडीच्या सुनीता आखाडे, तर आमदार मकरंद पाटील यांच्या गटातून उज्ज्वला तोष्णिवाल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पाचगणीतून विद्यमान नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, विरोधी गटातील महेश चौरासिया व उज्ज्वला महाडिक यांनी अर्ज भरले आहेत. वाईतून जनकल्याण आघाडीचे नंदकुमार खामकर, शोभा शिंदे, तीर्थक्षेत्र आघाडीचे भूषण गायकवाड या तिघांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. कऱ्हाडमधून आमदार बाळासाहेब पाटील विरोधातील जाधव गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे, तर वाई-महाबळेश्वर-पाचगणीची सत्ता खेचण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी तयारी केली आहे. या निवडीमुळे कऱ्हाड तसेच वाई मतदारसंघांतील राजकारण तापले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Four Municipal Chief Unions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.