चोरीप्रकरणी चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:52 AM2021-02-27T04:52:48+5:302021-02-27T04:52:48+5:30

फलटण : फलटण शहरातील महिला व मुलींच्या हातातील मोबाईल पर्स जबरदस्तीने हिसकावून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास आणि त्याचा माल ...

Four persons in police custody in theft case | चोरीप्रकरणी चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

चोरीप्रकरणी चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

Next

फलटण : फलटण शहरातील महिला व मुलींच्या हातातील मोबाईल पर्स जबरदस्तीने हिसकावून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास आणि त्याचा माल खरेदी

करणाऱ्या तिघांना फलटण शहर पोलिसांनी शिताफीने पकडून २ लाख २४ हजार

रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला, अशी माहिती जिल्हा पोलीस

प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी दिली.

सुरेश रमेश कदम (रा. ब्राह्मण गल्ली, फलटण) असे चोरीप्रकरणी अटक केलेल्याचे तर आशिष हेमंत अहिवळे(रा. सोमंथळी), मयूर संजय साळवे, सौरभ संभाजी जाधव (दोघे रा. सुरवडी) असे माल घेणाऱ्यांची नावे आहेत.

गेल्या दोन महिन्यापासून फलटण शहरात लक्ष्मीनगर, संजीवराजे नगर, गोळीबार मैदान, स्वामी

विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय या भागासह फलटण शहर पोलीस स्टेशनच्या

हद्दीत दुचाकीवरून जा-ये करणाऱ्या विशेषत: महिला व मुलींना

टार्गेट करून एक अनोळखी २० ते २२ वर्षे वयाचा चोरटा त्यांचा पाठलाग करीत

त्यांचा पाठोपाठ मोटरसायकल चालवित जात असत. आजूबाजूला तसेच मागे पुढे कोण

नाही, हे पाहून संधी मिळताच महिला, मुलीच्या हातातील पर्स, अथवा गाडीचे

बास्केट, हँडेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून याशिवाय

रस्त्याने मोबाईल फोनवर बोलत जाणाऱ्या महिला व मुलीच्या हातातील मोबाईल

जबरदस्तीने ओढून पोबारा करीत होता. त्यास फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक

भारत किंद्रे यांच्या पथकाने जेरबंद केलेले आहे. सुरेश कदम याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या माहितीवरून चोरीचा माल घेणाऱ्या आशिष अहिवळे, मयूर साळवे, सौरभ जाधव या संशयितांनाही पोलिसांनी अटक

केली आहे. तिघांकडून २ लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे, अशी माहिती

सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे,

पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, नितीन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Four persons in police custody in theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.