साताऱ्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत, २0 ते २२ एप्रिल कालावधीत कोईमतूर येथे स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:27 PM2018-03-29T17:27:32+5:302018-03-29T17:27:32+5:30
सातारा जिल्ह्यातील स्नेहा जाधव, सुशांत जेधे, चैत्राली गुजर व वैष्णवी यादव हे चार अॅथलेटिक खेळाडू कोईमतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धा २0 ते २२ एप्रिल या कालावधीत होणार आहे.
सातारा : जिल्ह्यातील स्नेहा जाधव, सुशांत जेधे, चैत्राली गुजर व वैष्णवी यादव हे चार अॅथलेटिक खेळाडू कोईमतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धा २0 ते २२ एप्रिल या कालावधीत होणार आहे.
नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून ही निवड करण्यात आली. स्नेहा जाधव हिने हॅमर थ्रो स्पर्धेत ४६.७९ मीटर, सुशांत जेधे याने १0 हजार मीटर स्पर्धेत ३३ मिनिट २२ सेकंद, चैत्राली गुजर हिने २00 मीटर स्पर्धा २५.४ सेकंदात पार केली. १00 मीटर स्पर्धेत ११.९ अशी कामगिरी नोंदवली आहे.
वैष्णवी यादव हिने ४00 मीटर हर्डल्समध्ये ६६.७ सेकंदांची नोंद केली आहे. कोइमतूर येथे होणाऱ्या २0 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत हे चारही खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या खेळाडूंना कालिदास गुजर, दिलीप चिंचकर, राजगुरु कोचळे यांनी मार्गदर्शन केले. संघटनेचे पदाधिकारी पांडुरंग शिंदे, राम कदम, उत्तमराव माने, अशोकराव थोरात, संजय वाटेगावकर व सर्व सदस्य खेळाडूंनी त्यांचे कौतुक केले आहे.