पडळ खूनप्रकरणी आरोपी शोधासाठी चार पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:09+5:302021-03-14T04:35:09+5:30
वडूज : संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण हादरून सोडण्याऱ्या पडळ (ता. खटाव) येथील खूनप्रकरणी पसार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी चार ...
वडूज : संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण हादरून सोडण्याऱ्या पडळ (ता. खटाव) येथील खूनप्रकरणी पसार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी चार पोलीस पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत.
पडळ (ता. खटाव) येथील खटाव- माण ॲग्रो लि. पडळ येथे प्रोसेसिंग मुख्य अधिकारी म्हणून काम करणारे जगदीप थोरात (रा. गोवारे, ता. कऱ्हाड) यांना अफरातफर केल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान थोरात यांचा मृत्यू झाला होता. जाब-जबाबवरून वडूज पोलीस ठाण्यात २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यापैकी कारखान्याचे को-चेअरमन मनोज घोरपडे, संचालक संग्राम घोरपडे यांच्यासह चार जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने मंगळवार, दि. १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर इतर पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चार पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
-------