आठवड्यातून चारवेळा छावण्यांची तपासणी-- सातारा प्रशासनाकडून दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:33 AM2019-05-08T00:33:25+5:302019-05-08T00:34:36+5:30

सातारा : जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईची स्थिती वाढल्याने जनावरांसाठी छावण्या सुरू आहेत. या छावण्यांतून जनवारांना योग्य चारा, पशुखाद्य ...

 Four times a week check of camps - efficiency by Satara administration | आठवड्यातून चारवेळा छावण्यांची तपासणी-- सातारा प्रशासनाकडून दक्षता

आठवड्यातून चारवेळा छावण्यांची तपासणी-- सातारा प्रशासनाकडून दक्षता

Next
ठळक मुद्दे जिल्हा पथक १५ दिवसांतून जाणार

सातारा : जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईची स्थिती वाढल्याने जनावरांसाठी छावण्या सुरू आहेत. या छावण्यांतून जनवारांना योग्य चारा, पशुखाद्य मिळते का नाही हे पाहण्यासाठी जिल्हास्तरीय पथकाला १५ दिवसांतून एकदा तर तालुका पथकाला आठवड्यातून चारवेळा तपासणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पाऊस पडला. त्यामुळे अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. माण, खटाव, फलटण या तालुक्यांत तर पाण्याबरोबरच चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण झालाय. यामुळे शेतकऱ्यांमधून चारा छावणी सुरू करण्याची मागणी सतत होत होती. त्यानुसार मागणीप्रमाणे प्रशासाने जिल्ह्यातील १५ हून अधिक ठिकाणी छावणी सुरू करण्यास परवानगी दिली. यामध्ये सर्वाधिक छावण्या या माण तालुक्यात आहेत. तर यापुढे चाºयाचा प्रश्न अधिक उद्भवणार असून, इतर तालुक्यातही छावण्या सुरू कराव्या लागतील. तसेच पाण्याचाही प्रश्न भेडसावणार आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाºयांना मुख्यालयी राहण्याची सूचना केली आहे. जे मुख्यालयी राहणार नाहीत, अशांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

जिल्ह्यात सध्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची छावणींच्या तपासणीसाठी नियुक्ती केलीय. तसेच जिल्हा व तालुका पथके निर्माण करण्यात आली आहेत. ही पथके छावणीत जाऊन तपासणी करणार आहेत.
जिल्हा तपासणी पथकात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रमुख आहेत. तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, कृषी विकास अधिकारी हे सदस्य असतील. तसेच गटविकास अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या तपासणी पथकाला कामे ठरवून दिली आहेत.

मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना छावणीतील लेखाविषयक नोंदवही व अभिलेखाची तपासणी पंचायत समितीकडील लेखाधिकाºयांकडून दर आठवड्याला करावी लागणार आहे. जिल्हा कृषी अधिकाºयांना कृषी विकास अधिकाºयांमार्फत चारा छावणीचे रजिस्टर, चाºयाच्या दर्जाबाबत तपासणी करून घ्यावी लागणार आहे.

जनावरांची नोंद अन् लसीकरण
जिल्हा आरोग्य अधिकाºयांना संबंधित तालुक्यातील वैद्यकीय अधिकाºयांमार्फत छावणीतील शेतकºयांची आरोग्य तपासणी करणे, पाणी नमुने तपासणी आणि साथ रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, याबाबत काळजी घ्यावी लागेल. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांना पशुधन विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व पर्यवेक्षक यांच्यामार्फत छावणीतील जनावरांची नोंद व लसीकरण करणे. तसेच चारा व पशुखाद्याची तपासणी १५ दिवसांतून एकदा प्रयोग शाळेत करावी लागणार आहे.

Web Title:  Four times a week check of camps - efficiency by Satara administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.