चार गावांतील विद्यार्थ्यांचा नावेतून प्रवास!

By Admin | Published: February 22, 2015 08:29 PM2015-02-22T20:29:23+5:302015-02-23T00:20:20+5:30

पाटण तालुका : लेंडोरी, अणेरी, कुसवडे, चिरंबे ग्रामस्थांची पलीकडे येण्यासाठी धडपड

Four villagers travel by boat! | चार गावांतील विद्यार्थ्यांचा नावेतून प्रवास!

चार गावांतील विद्यार्थ्यांचा नावेतून प्रवास!

googlenewsNext

पाटण : कोणी चारचाकीतून मिरवतंय तर कोणी बाईकवरून फिरतंय; परंतु पाटण तालुक्यातील कोयना नदीपलीकडील चार गावांतील ग्रामस्थांची अजूनही धडपड सुरू आहे. कोयना नदी पार करण्यासाठी नाव मिळाली तर पुढचं गाव गाठता येतं, अन्यथा काठावर हताशपणे बसून राहावे लागत आहे. लेंडोरी, अणेरी, कुसवडे, चिरंबेसह अनेक गावांतील विद्यार्थी कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरील विद्यालयात नावेतूनच येतात.संगमनगर धक्का पुलापलीकडील सुमारे ३५ गावे संपर्कहीन आहेत. त्यापैकीच काही गावांचं दुखणं आजही सुरू आहे. यांच्यासाठी एक नव्हे तर दोन पुलांचे बांधकाम सध्या कोयना नदीवर सुरू आहे. मात्र, आजही येथील लोकांचे व लहान मुलांचे हाल सुरू आहेत. सध्या अस्तित्वात असणारा संगमनगर धक्का हा जुना पूल अनेक गावांना लांबच पडतो. त्यामुळे कोयना नदीतून पलीकडे जाण्यासाठी गावकऱ्यांनी नाव आणि नावाडी यांची सोय अनेक वर्षांपासून केलेली आहे. पाटण, कोयना किंवा इतर ठिकाणी दररोज ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना ठराविक नेमून दिलेल्या दरात नावेची सेवा मिळते. तर या गावांत येणाऱ्या पाहुण्यांना नाममात्र पैसे घेऊन सेवा दिली जातात. तरीही अनेक संकटे येतात. वेळेतच त्याठिकाणी पोहोचेल याची खात्री नाही. पलीकडे गेलेली नाव अलीकडे येणाऱ्या लोकांनी भरून आल्याशिवाय येत नाही, मग ताटकळत बसावे लागते. (प्रतिनिधी)

नावेने प्रवास करणाऱ्या मणेरी, चिरंबे, लेंडोरी, कुसवडे आदी गावांचा वनवास थोड्याच दिवसांत संपणार आहे. मणेरी, गौंड येथे कोयना नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे ही गैरसोय दूर होणार असल्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
- नथुराम सावंत,
ग्रामस्थ, मणेरी


नावेचा प्रवासही धोकादायक
कोयना नदीतून अलीकडे येण्यासाठी नावेत बसणाऱ्या वयोवृद्ध माणसांना किंवा लहान मुलांना चढउतार करताना पाण्यात पडण्याचा धोका संभवतो. अशा घटनाही घडल्या आहेत. पावसाळ्यात तर कोयना नदीला पूर येतो, मग जीव धोक्यात घालून नावेचा प्रवास करावा लागतो, अन्यथा नाव बंद ठेवावी लागते.

Web Title: Four villagers travel by boat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.