चौदाशे कुटुंबात ‘मुलगी झाली हो’..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:23 AM2021-07-22T04:23:54+5:302021-07-22T04:23:54+5:30

कऱ्हाड : बाळाचा जन्म हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो. आई-बाबा होण्यासाठी अधीर झालेल्या दाम्पत्यांसाठी तर हा क्षण स्वर्गसुख ...

Fourteen hundred families have a daughter ..! | चौदाशे कुटुंबात ‘मुलगी झाली हो’..!

चौदाशे कुटुंबात ‘मुलगी झाली हो’..!

Next

कऱ्हाड : बाळाचा जन्म हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो. आई-बाबा होण्यासाठी अधीर झालेल्या दाम्पत्यांसाठी तर हा क्षण स्वर्गसुख देणारा ठरतो. कऱ्हाडातही गत वर्षभरात सुमारे २ हजार ९०० दाम्पत्यांना हे सुख मिळाले असून, चौदाशे कुटुंबांमध्ये कन्यारत्न जन्मले आहे.

मुलींचा जन्मदर वाढवणे, लिंग निवडीला प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे यासाठी विविध प्रयत्न होत आहेत. त्याबरोबरच स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठीही वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. कऱ्हाडात पालिकेच्यावतीनेही स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, मुलींचा जन्मदर त्यामुळे वाढला आहे. शहरात उपजिल्हा रुग्णालयासह इतर अनेक खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी बहुतांश रुग्णालयांतही मुलीच्या जन्मानंतर तिच्या स्वागतासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून संबंधित मुलींचे भविष्य संरक्षित करण्याचा प्रयत्नही पालिका आणि रुग्णालयांमार्फत केला जातो.

कऱ्हाड शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये जन्म घेतलेल्या बाळांची नोंद पालिकेत होते. त्यापैकी बहुतांश बालके शहरासह तालुक्यातील असतात तर परजिल्ह्यातील काही बालकांचा जन्मही कऱ्हाडच्या रुग्णालयामध्ये होतो. गत वर्षभरात कऱ्हाड शहरात सुमारे २ हजार ९०० बालकांचा जन्म झाला असून, त्यामध्ये १ हजार ४००पेक्षा जास्त मुलींची संख्या आहे.

- चौकट

मुलींना विविध योजनांचा लाभ

दोन घरे प्रकाशमान करणाऱ्या मुलींची भ्रुणहत्या रोखण्यासोबतच, मुलींच्या शिक्षण व आरोग्याकडे लक्ष देऊन सुधारणा करणे, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, मुलींचा होणारा बालविवाह थांबविणे आणि मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा अनेक मुलींना लाभही झाला आहे.

- चौकट (फोटो : २१ केआरडी ०१)

२०२०-२०२१मध्ये बाळांचा जन्म

महिना : मुले : मुली

मार्च : २७३ : २४०

एप्रिल : १८६ : १६१

मे : १४१ : १४०

जून : १०० : १०६

जुलै : २२१ : २००

ऑगस्ट : ९५ : ९१

सप्टेंबर : ७९ : ७७

ऑक्टोबर : ५५ : ७२

नोव्हेंबर : ७८ : ६४

डिसेंबर : ७५ : ९६

जानेवारी : ५६ : ६०

फेब्रुवारी : ६३ : ३१

मार्च : ७६ : ७९

- चौकट (फोटो : २१केआरडी०२

२९१५ बाळांपैकी...

मुले : १४९८

मुली : १४१७

- चौकट

सरासरी

मुली : ४८.६१ टक्के

मुले : ५१.३८ टक्के

फोटो : २१केआरडी०३

कॅप्शन : प्रतिकात्मक

Web Title: Fourteen hundred families have a daughter ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.