माहिती अधिकाराखाली चौदा लाखांची खंडणी : कऱ्हाडात फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:18 AM2018-03-15T01:18:19+5:302018-03-15T01:18:19+5:30
कऱ्हाड : माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करीत प्रकरण मिटवण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांकडे चौदा लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार
कऱ्हाड : माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करीत प्रकरण मिटवण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांकडे चौदा लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विस्तार अधिकारी संजय विलासराव सोनवणे (रा. केसरकर पेठ, सातारा) यांनी बुधवारी रात्री कºहाड शहर पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या नावाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने १९९६ ते २०१३ या कालावधीत ग्रामपंचायतीला मिळणाºया १५ टक्के निधीचा तपशील माहितीच्या अधिकारात मागितला होता. माहितीच्या अधिकाराच्या अर्जावर कार्यवाही झाल्यावर त्या कार्यकत्याला १५ टक्के निधीच्या अहवालाची सविस्तर माहिती देण्यात आली. तो निधी वापरताना अनियमितता झाल्याचे कार्यकर्त्याने समोर आणले. याबाबत त्याने जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी कºहाड तालुक्यातील प्रत्येक ग्रामसेवकाने सात हजार रुपये असे एकूण १४ लाख रुपये द्यावेत, असा तगादा त्याने प्रशासनातील अधिकाºयांकडे लावला.
माहिती अधिकार कार्यकर्त्याकडून मागितल्या जाणाºया खंडणीचा कॉल अधिकाºयांनी रेकॉर्ड केला. कॉल रेकॉर्ड करून हा
प्रकार शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधवयांना सांगितला. जाधव यांनी याप्रकरणाची सलग दोन दिवस चौकशी करून फिर्याद देण्यास सांगितले.
विस्तार अधिकारी एकवटले
माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी कºहाड तालुक्यातील बहुतांश विस्तार अधिकाºयांशी संपर्क साधल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे. तसेच त्याने सर्व विस्तार अधिकाºयांना ठराविक रक्कम सांगून सर्वांची मिळून एकूण १४ लाख रुपये द्या, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर सर्व विस्तार अधिकाºयांनी एकत्र येऊन संबंधिताच्या धमकीला न जुमानता पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.