उच्चपदस्थ चोवीस अधिकारी मलकापुरात

By admin | Published: February 15, 2015 10:12 PM2015-02-15T22:12:53+5:302015-02-15T23:40:19+5:30

आज अभ्यास दौरा : यशस्वी योजनांची करणार पाहणी

Fourth highest official in Malakpur | उच्चपदस्थ चोवीस अधिकारी मलकापुरात

उच्चपदस्थ चोवीस अधिकारी मलकापुरात

Next

मलकापूर : शहरात नगरपंचायतीने यशस्वीपणे राबविलेल्या योजनांचा अभ्यास करण्यासाठी देशातील विविध राज्यांतून तब्बल २४ आयएएस व आयपीएस दर्जाचे अधिकारी सोमवार, दि. १६ रोजी मलकापूरला येणार आहेत. संबंधित अधिकारी तीन दिवस योजनांचा अभ्यास करणार आहेत. मलकापूरच्या पाणी योजनेला ‘पंतप्रधान अ‍ॅवॉर्ड’ व ‘नॅशनल अर्बन वॉटर अ‍ॅवॉर्ड’ हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर ही योजना सातत्याने सहा वर्षे यशस्वीपणे सुरू आहे. या पाणी योजनेबरोबरच ‘प्रियदर्शनी कन्यारत्न योजना’, ‘प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान’, यासारखे नवनवीन उपक्रम नगरपंचायतीने यशस्वीपणे राबविले आहेत. ‘सोलर-सिटी’ व ४२ कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया योजनांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे नगरपंचायतीचे सातत्य बघून शासनाने या योजनांच्या यशस्वीतेचा अभ्यास करण्यासाठी २४ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यानुसार सोमवारी हरियाणाचे बलराज सिंग, छत्तीसगडच्या शालिनी रैना, तेलंगणाचे वीर ब्रह्मा, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आनंदराव पाटील यांच्यासह विविध राज्यांतील अधिकारी व महाराष्ट्र मख्य सचिव असे २४ अधिकारी मलकापुरातील योजनांचा अभ्यास करणार आहेत. येणारे सर्व अधिकारी व स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नगराध्यक्षा सुनंदा साठे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राजेंद्र तेली, जलअभियंता यू. पी. बागडे हे योजनांचे सादरीकरण करणार आहेत. (वार्ताहर)

तीन दिवसांचा अभ्यास दौरा
शासनाचे व विविध राज्यांतून आलेले २४ आयएसआय अधिकारी मलकापूरचा अभ्यास करण्यासाठी तीन दिवस मलकापुरातच थांबणार आहेत. यशस्वी योजनांचा अभ्यासानंतर ते प्रशासकीय कामकाजासह नगरपंचायत कार्यशाळेतील जिल्हा परिषद शाळा, बचत गट, महिला मंडळे, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशीही संवाद साधून तीन दिवसांत शहराचा सर्वांगीण अभ्यास करणार आहेत.

Web Title: Fourth highest official in Malakpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.