सातारा: देशी दारू दुकानाचे लायसन देण्याच्या नावाखाली दहा लाखाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:56 PM2022-11-23T13:56:57+5:302022-11-23T13:57:42+5:30

कोरेगाव : देशी दारू दुकानाचे लायसन मिळवून देतो, असे सांगून कोरेगावातील व्यावसायिकाची दहा लाखाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ...

Fraud of 10 lakhs in the name of giving license to country liquor shop | सातारा: देशी दारू दुकानाचे लायसन देण्याच्या नावाखाली दहा लाखाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

सातारा: देशी दारू दुकानाचे लायसन देण्याच्या नावाखाली दहा लाखाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next

कोरेगाव : देशी दारू दुकानाचे लायसन मिळवून देतो, असे सांगून कोरेगावातील व्यावसायिकाची दहा लाखाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, कोरेगावात शशिकांत पांडुरंग घोडके हे सेवानिवृत्त असून, व्यावसायिक आहेत. त्यांना देशी दारू दुकानाचे लायसन मिळवून देण्याचे आमिष ओगलेवाडीतील रहिवासी विनायक शंकर रामुगडे आणि कोरेगाव शहरातील कलावती ऊर्फ प्रिया रामचंद्र चव्हाण यांनी दाखविले होते. या दोघांनी घोडके यांचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी ९ लाख ८१ हजार ५०० रुपये उकळले. अन् लायसन दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे घोडके यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.

घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नितीन सावंत याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Fraud of 10 lakhs in the name of giving license to country liquor shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.