मोबाईलचे पार्टस विकून सहा लाखांची फसवणूक, वडूजच्या एका विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 03:59 PM2022-06-10T15:59:45+5:302022-06-10T16:00:07+5:30
कंपनीने विश्वासाने दिलेले मोबाईलचे स्पेअर पार्टस स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विकले
सातारा : सातारा शहरातील एका मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून स्पेअर पार्टस विकून ६ लाख १८ हाजरांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वडूजच्या एका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी अभिषेक घोष (रा. हडपसर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर अमित अशोक महापुरे (वय ३१, रा. वडूज, ता. खटाव) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
डिसेंबर २०२१ पासून २८ एप्रिल २०२२ पर्यंत फसवणुकीचा हा प्रकार घडला. कंपनीने विश्वासाने दिलेले मोबाईलचे स्पेअर पार्टस स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विकले आहेत. यातून ६ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली, असे या तक्रारी स्पष्ट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे हे तपास करीत आहेत.