तारण दिलेले सोने परत न देता फसवणूक, सातारा शहरातील प्रकार
By नितीन काळेल | Published: October 25, 2023 04:45 PM2023-10-25T16:45:10+5:302023-10-25T16:45:39+5:30
एका विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद
सातारा : सराफा दुकानात तारण दिलेले सोने परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शकुंतला अशोकराव शिंदे (रा. सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार विजय वसंतराव चाैधरी (रा. देशमुख काॅलनी, सतारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार जानेवारी २०१८ ते आॅक्टोबर २०२३ दरम्यान घडला आहे. तक्रारीनुसार फिर्यादीने सराफा दुकानात सोने तारण ठेऊन २० लाख ४८ हजार ९३१ रुपये व्याजाने घेतले होते. हे कर्ज व्याजासह फिर्यादीने परत दिले. त्यानंतर तारण सोने मागितले. पण, सराफा व्यावसायिकाने परत न देता फिर्यादीची फसवणूक केली.
सातारा शहर पोलिस ठाण्यात विश्वास संपादन करुन फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी हवालदार भिसे हे तपास करीत आहेत.