ब्रिलियंट अकॅडमीतर्फे मोफत ब्रिज कोर्सचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:17+5:302021-04-30T04:50:17+5:30
कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या. पालक व विद्यार्थी दहावीचे गुण आधार मानून ...
कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या. पालक व विद्यार्थी दहावीचे गुण आधार मानून पुढील शिक्षणाची दिशा ठरवत असतात; परंतु या परिस्थितीत त्यांना दिशादर्शक म्हणून ब्रिलियंट कॉलेज काही महत्त्वपूर्ण योजना अगदी मोफत घेऊन येत आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना दहावीच्या शैक्षणिक वर्षात अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना स्वतःचे मूल्यमापन करता येणे शक्य व्हावे तसेच राष्ट्रीय पातळीवरील विविध परीक्षांची तयारी करून डॉक्टर, इंजिनिअर, रिसर्चर, पायलट, आर्किटेक्ट, आदी बनण्याचे स्वप्न साकार करता यावे, यासाठी ब्रिलियंट ज्युनिअर कॉलेज, पालक व विद्यार्थ्यांना एक छोटीशी मदत म्हणून काही महत्त्वपूर्ण योजना अगदी मोफत देत आहे. कारण अकरावी, बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे, त्यातून त्यांची सुटका होणार नाही.
राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध परीक्षा, त्यांचे स्वरूप, स्कॉलरशिप योजना, प्रवेश प्रक्रिया, या परीक्षांची तयारी आदींबाबत सखोल मार्गदर्शन, मंगळवार व रविवारी मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन, दहावीची परीक्षा यावर्षी झाली नसल्यामुळे विद्यार्थी व पालक यांना करिअरची पुढील दिशा निवडण्यात मदत व्हावी म्हणून दहावीच्या गणित व विज्ञान विषयांच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर व मेंटल ॲबिलिटी यावर आधारित २०० गुणांची परीक्षा. सायन्स शाखेतून करिअर करत असताना विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील, जेईई, नीट, आयआयएसईआर, केव्हीपी वाय, ऑलिम्पियाड, आदी परीक्षा देण्यासाठी अकरावी व बारावी एनसीईआरटी अभ्यासक्रमाची तयारी करावी लागते. दहावीची परीक्षा आता झाली नसली तरीही दोन वर्षांनंतर या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणारच आहे. (वा.प्र.)