हृदयविकार रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:33+5:302021-01-13T05:40:33+5:30

सातारा : हृदयविकार रुग्णांसाठी गुरुवार, दि. १४ जानेवारी रोजी मोफत आरोग्य, हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी ...

Free screening camp for heart patients | हृदयविकार रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर

Next

सातारा : हृदयविकार रुग्णांसाठी गुरुवार, दि. १४ जानेवारी रोजी मोफत आरोग्य, हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय लावंड यांनी दिली.

रुबी हॉल क्लिनिक (सातारा) येथे गुरुवारी सकाळी ९ ते १२ व रुबी मेडिकल सर्व्हिसेस (कऱ्हाड) येथे दुपारी १ ते ३ या वेळेत हे शिबिर होणार आहे. छातीमध्ये दुखणे, घाम येणे, चक्कर येणे, धाप लागणे, गुदमरणे, साखरेचे प्रमाण वाढणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे अशा प्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय तज्ज्ञांचा मोफत सल्लाही मिळणार आहे. सवलतीसाठी पिवळे रेशनकार्ड व उत्पन्नाचा दाखला आवश्यक असल्याची माहिती लावंड यांनी दिली. (वा.प्र.)

Web Title: Free screening camp for heart patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.