मोफत ‘विलाश्री थाळी’मुळे कोरोनाबाधितांच्या मुखात घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:48+5:302021-06-03T04:27:48+5:30

मलकापूर : कोरोना रूग्णांसोबत बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांना जेवण मिळत नाही. ही गरज ओळखून येथील युवकांनी पुढाकार घेत एक स्तुत्य ...

Free ‘Vilashree Thali’ for grass in the mouths of corona victims | मोफत ‘विलाश्री थाळी’मुळे कोरोनाबाधितांच्या मुखात घास

मोफत ‘विलाश्री थाळी’मुळे कोरोनाबाधितांच्या मुखात घास

Next

मलकापूर : कोरोना रूग्णांसोबत बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांना जेवण मिळत नाही. ही गरज ओळखून येथील युवकांनी पुढाकार घेत एक स्तुत्य उपक्रम राबवला. कऱ्हाड परिसरात ‘विलाश्री थाळी’मुळे गरजूंना मोफत जेवणाची सोय झाली. रूचकर व पौष्टिक जेवणाचा एका महिन्यात तब्बल १ हजार २६० कोरोनाबाधितांसह नातेवाईकांना मोठा आधार मिळाला.

कोरोना रूग्णांसह नातेवाईकांना जेवण मिळत नाही, त्यांचे हाल होतात. अशा गरजूंची जेवणाची सोय व्हावी, या उद्देशाने मलकापुरातील युवकांनी एक उपक्रम हाती घेतला. दिवंगत आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या स्मरणार्थ व सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या समाजकार्याच्या प्रेरणेतून येथील नगरसेविका कमल कुराडे, हॉटेल सातारी गावरान ठसकाचे संचालक प्रशांत पाचुपते व जयंत कुराडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्याचे ठरवले आणि दि. २९ एप्रिलला मोफत विलाश्री थाळी देण्यास सुरुवात केली. घरगुती व चांगल्या दर्जाचे जेवण कऱ्हाड परिसरातील रूग्णालयांमध्ये पोहोच केले जात आहे. एका महिन्यात १ हजार २६० कोरोना पीडितांनी याचा लाभ घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांनी बुधवारी प्रत्यक्ष या उपक्रमाची माहिती घेऊन जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी धनाजी काटकर, नगरसेवक सागर जाधव, सत्यवान पाटील, अमर इंगवले, जीवन पाटील, स्वप्नील बारपट्टे उपस्थित होते. शासनाच्या नियमांचे व वेळेचे पालन करून सायंकाळी ७ ते ८ यावेळेत पौष्टिक विनामूल्य जेवण दवाखान्यात दिले जाते. ज्यांना जेवणाची आवश्यकता आहे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कुराडे व पाचुपते यांनी यावेळी केले.

कोट

परगावातील कोरोनाबाधितांच्या जेवणाची गरज ओळखून शहरातील प्रत्येक रुग्णालयाबाहेर व सोशल मीडियाद्वारे आम्ही संपर्क नंबर पाठवले. गरजूंनी संपर्क साधून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. आत्तापर्यंत १ हजार २६० गरजूंनी याचा लाभ घेतला आहे. गृह अलगीकरणामध्ये असणाऱ्या गरजू बाधितांनाही आम्ही मोफत जेवणाचे डबे पोहोच करत आहोत.

- प्रशांत पाचुपते

युवक, मलकापूर

कोट

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत पैसे असूनही वेळेवर जेवण मिळत नाही. त्यामुळे खरी गरज ओळखून युवकांनी १ हजार २६० गरजूंना चांगल्या दर्जाचे मोफत जेवण दिले. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. इतर युवकांनीही याचा आदर्श घेऊन महामारीच्या काळात जी मदत करता येईल, ती करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

- उदयसिंह पाटील

जिल्हा परिषद सदस्य

फोटो ओ‌‌ळ

जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष जेवण करुन या उपक्रमाची माहिती घेतली. यावेळी धनाजी काटकर, नगरसेवक सागर जाधव, सत्यवान पाटील, अमर इंगवले, जीवन पाटील, स्वप्नील बारपट्टे उपस्थित होते. (छाया- माणिक डोंगरे)

===Photopath===

020621\img-20210531-wa0034.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

जिल्हापरिषद सदस्य उदयसिंह पाटील यांनी आज प्रत्यक्ष जेवून या उपक्रमाची माहिती घेतली. यावेळी धनाजी काटकर, नगरसेवक सागर जाधव, सत्यवान पाटील, अमर इंगवले, जीवन पाटील, स्वप्निल बारपट्टे उपस्थित होते. (छाया- माणिक डोंगरे)

Web Title: Free ‘Vilashree Thali’ for grass in the mouths of corona victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.