विलगीकरण कक्षातील रुग्णांना मोफत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:58+5:302021-06-02T04:28:58+5:30

तरडगाव : चांदोबाचा लिंब (तरडगाव, ता. फलटण) येथे लोकसहभागातून उभारलेल्या विलगीकरण कक्षातील कोरोनाबाधितांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी ...

Free water supply to patients in isolation ward | विलगीकरण कक्षातील रुग्णांना मोफत पाणीपुरवठा

विलगीकरण कक्षातील रुग्णांना मोफत पाणीपुरवठा

Next

तरडगाव : चांदोबाचा लिंब (तरडगाव, ता. फलटण) येथे लोकसहभागातून उभारलेल्या विलगीकरण कक्षातील कोरोनाबाधितांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गायकवाड यांनी पुढाकार घेतला असून, प्रत्यक्षात कृतीतून त्यांनी फिल्टर पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या दररोज २० पाण्याचे जार मोफत दिले जात आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन केले जात आहेत. तरडगाव येथील विलगीकरण कक्षात सध्या ४० रुग्ण आहेत. कक्षाची उभारणी झाल्यापासून परिसरातील दानशूर व्यक्ती या ना त्या स्वरूपात मदत करण्यासाठी पुढे सरसावताना दिसत आहेत. त्यानुसार सामाजिक बांधिलकी जपत प्रशांत गायकवाड यांनी पहिल्या दिवसापासून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. याकामी ते काळजीपूर्वक रोज पाणी पुरवठा करीत आहेत. यामध्ये खंड पडू न देता शेवटपर्यंत आपण कक्षातील बाधितांना पिण्याचे पाणी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा. कक्षातील रुग्ण हे आपलेच बांधव आहेत. त्यांना या उद्भवलेल्या कोरोना महामारीतून बाहेर काढणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाने कोणत्याही स्वरूपात विविध ठिकाणी उभारलेल्या विलगीकरण कक्षास निस्वार्थीपणे सढळ हाताने सहकार्य करावी, असे आवाहन प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Free water supply to patients in isolation ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.