स्वखर्चाने पुसेगाव गणात मोफत पाणीपुरवठा
By admin | Published: April 11, 2017 04:09 PM2017-04-11T16:09:03+5:302017-04-11T16:09:03+5:30
सामाजिक बांधिलकी : टंचाईमुळे गावे, वाड्यावस्त्यांना पाण्याची झळ
आॅनलाईन लोकमत
पुसेगाव (जि. सातारा), दि. ११ : पुसेगाव भागात सध्या पाणीटंचाई वाढू लागली आहे. अनेक वाड्यावस्त्या तसेच गावांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुसेगाव येथील कार्यकर्ते माजी उपसरपंच संतोष उर्फ बाळासाहेब जाधव आणि सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुरेशशेठ जाधव यांच्यातर्फे पुसेगाव गणातील पाणीटंचाई असलेल्या विविध गावांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
येथील छत्रपती शिवाजी चौकात आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. दोन्ही जाधव यांच्या दातृत्वाचे आमदार शिंदे यांनी कौतूक करुन पाणी पुरवण्याचा उपक्रम इतरांनाही प्रेरणादायी असल्याचे नमुद केले. अन्य भागातील कार्यकर्त्यांनीही अशा उपक्रमांसाठी पुढे यावे असे आवाहन केले.
यावेळी उपसभापती कैलास घाडगे, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप विधाते, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, राजेंद्र कचरे, जगनशेठ जाधव, हिंदूराव देशमुख, मनोज जाधव, गणेश जाधव, सुसेन जाधव, अॅड. विजयराव जाधव, मोहन जाधव, बाळासाहेब जाधव, अशोकराव जाधव, सदाशिव जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप जाधव, सुश्रूत जाधव, आकाश जाधव, राजेंद्र जाधव, राजेंद्र गाडे, वैभव गायकवाड, अभिजीत फडतरे, चंद्रकांत जाधव, प्रदीप जाधव उपस्थित होते.
यावर्षी खटाव तालुक्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रोत्साहानामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या प्रेरणेमुळे आपण हा समाजोपयोगी उपक्रम स्वखचार्ने राबवत असल्याचे बाळासाहेब जाधव व सुरेशशेठ जाधव यांनी सांगितले.
या उपकमांतर्गत बारा हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीटंचाई असलेल्या पुसेगाव गणातील गावांना मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे अशा गावांनी संपर्क साधाव असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)