फुकटचे कनेक्शन एकदाच ‘पाजणार पाणी’!

By admin | Published: December 9, 2015 11:45 PM2015-12-09T23:45:22+5:302015-12-10T01:02:02+5:30

दीड वर्षांचे बिल भरताना पडणार बोजा : साताऱ्यातील नवीन नळकनेक्शन अनधिकृतच; दंडाचा आकडा कदाचित मोठा

Free will only 'water to be burnt' | फुकटचे कनेक्शन एकदाच ‘पाजणार पाणी’!

फुकटचे कनेक्शन एकदाच ‘पाजणार पाणी’!

Next

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगर पालिका यांच्या मार्फत नव्याने दिलेल्या नळ कनेक्शनची ग्राहकांनी पूर्तता नकेल्याने ही कनेक्शन्स अजूनही अनधिकृत मानली जात असून, जलवाहिन्यांच्या सर्व्हेनंतर नवीन घेणाऱ्याकनेक्शनलधारकाला एकत्र दंडासहित बिल भरावे लागणार आहे. गेल्या दीड वर्षांचे बिल नागरिकांना एकदमच द्यावे लागणार असल्याने सर्वसामान्यांना कर्ज काढूनच हे बिल भरावे लागणार आहे. शहरातील रस्ते डांबरीकरण करण्यापूर्वी जलवाहिनी टाकून कलेक्शन  दिली गेली होती. त्यावेळी काही मेहरबानांच्या मेहरबानीमुळे मागेल त्याला कनेक्शन देण्यात आले होते.तसेजीवनप्राधिकरणतर्फे एक अर्जदेखील नागरिकांना देण्यात आला होता. परंतु नळकनेक्शन जोडल्याने हे अर्ज धूळखात पडून राहिले. त्यामुळे ज्यांनी नळकनेक्शन जोडली आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जीवन प्राधिकरणकडे कागदपत्रांची पूर्तता केली नाही. या लोकांनाही बिले अद्याप दिली नसल्याचे प्राधिकरण कार्यालयाकडून सांगण्यात आले.नगर पालिकेकडून शहरात सुमारे १३ हजार अधिकृत नळकनेक्शन जोडली गेली आहेत. या काही कनेक्शनला मीटर बसविण्यात आले आहेत तर तर कनेक्शनला अजूनही मीटर बसविण्यात आले नाहीत. पालिका आणि जीवनप्राधिकरणामध्ये पाणी आकाराबाबत निर्णय झाला नसल्याचेलले जात आहे.
जीवनप्राधिकरणमार्फत सदर बझार, गोडोली, उत्तेकरनगर, देशमुख कॉलनी, करंजे, राधिका रोड, शिवराज पेट्रोलपंप या आदी भागात नवीन नळकनेक्शन दिली गेली आहेत. तसेच मीटरही बसविण्यात आले आहेत. परंतु अनेकांना ग्राहक नंबरच मिळाला नसल्याचे पुढे आले आहे. जीवनप्राधिकरणमार्फत सर्व भागात मीटरपद्धतीनेच पाणी आकार घेण्यात येणार असल्याने नव्याने घेतलेल्या कनेक्शन ग्राहकाला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
अनेक नागरिकांनी अद्याप बिले का आली नाहीत, याची विचारपूस केली. मात्र त्यांना जीवनप्राधिकरणकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. जीवनप्राधिकरणमार्फत सध्या शहरात सर्वच टाक्यांचा सर्वे सुरू असून, कोणत्या टाकीत किती पाणीपुरवठा केला जातो, याचा ताळमेळ घालून या अनधिकृत नळकनेक्शनधारकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)

असे दिले जाते कनेक्शन
नव्याने कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकाला सिटीर्व्हेचा उतारा द्यावा लागतो. त्यानंतर पालिकेने नाहरकत दाखला तसेच शंभर रुपयांच्या स्टँपवर प्रतिज्ञापत्र व मीटरची अनामत रक्कम भरूनच ग्राहकांना नंबर दिला जातो. त्यानंतर बिल येण्यास सुरुवात होते.

कागदपत्राअभावी कनेक्शन अनधिकृत
नव्याने रस्ता उखडू नये यासाठी मागेल त्याला नवीन कनेक्शन देण्यात आले. काही मेहरबानांनी अशी कनेक्शन देण्यासाठी भाग पाडल्याचे बोलले जात आहे. मात्र कादपत्रांची पूर्तता झाली नसल्याने ही कनेक्शन पुन्हा तोडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


एकाच घराला
दोन-तीन कनेक्शन
शहरातील अनेक ठिकाणी एकाच घराला दोन ते तीन नळकनेक्शन दिली गेली आहेत. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना अशा लोकांची डोकेदुखी वाढणार आहे.


शहरात १३ हजारांहून अधिक अधिकृत नळकनेक्शन आहेत. ज्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतली आहेत, त्याविषयी पालिका आणि जीवनप्राधिकरणमार्फत सर्वे सुरू आहे. हा सर्वे पूर्ण झाल्यानंतरच कारवाई संदर्भात वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील.
- संदीप सावंत, पाणी पुरवठा विभाग, सातारा पालिका

Web Title: Free will only 'water to be burnt'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.