फलटणमधील २१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये फ्रीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:23+5:302021-04-10T04:38:23+5:30

फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या ...

Freeze in 21 primary health sub-centers in Phaltan | फलटणमधील २१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये फ्रीज

फलटणमधील २१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये फ्रीज

Next

फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील २१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये १६५ लिटर्सचे फ्रीज मोफत उपलब्ध करून दिले आहेत.

सध्या फलटण तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये लस व इतर औषधींचा साठा करण्यासाठी फ्रीजची आवश्यकता भासत होती. हे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्वरित गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या वतीने २१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये फ्रीज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार यांनी दिली.

गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार म्हणाल्या, सध्या कोरोनाचे रुग्ण फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्येसुद्धा मोठ्या संख्येने सापडत आहेत. त्यामुळे ४५ वर्षे पूर्ण केलेल्यांनी लसीकरण करून घ्यावे. सध्या कोरोनाला दोन हात करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. लसीकरण केले म्हणजे, कोरोना होणार नाही असे नाही. परंतु कोरोना विषाणूसोबत लढण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये तयार होते. यासोबतच तालुक्यातील सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग व वारंवार हात धुणे हे नियमितपणे चालू ठेवले पाहिजे.

Web Title: Freeze in 21 primary health sub-centers in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.