मायणीत शुक्रवारी ग्रामीण साहित्य संमेलन
By admin | Published: February 11, 2015 09:32 PM2015-02-11T21:32:04+5:302015-02-12T00:37:42+5:30
ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन : संमेलनाध्यक्षपदी प्रमोद कोपर्डे यांची निवड
मायणी : पी. व्ही. पी. कॉलेज तासगाव महाविद्यालय योजनेअंतर्गत कला, वाणिज्य महाविद्यालय मायणी व नेहरू वाचनालय मायणी यांच्या वतीने शुक्रवार, दि. १३ रोजी येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये सातवे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे.
या संमेलनाध्यक्ष म्हणून सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रमोद कोपर्डे आहेत.
सकाळी ९ वाजता मायणी भाऊसाहेब गुदगे यांच्या हस्ते या व जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे, मायणी अर्बन बँकेचे चेअरमन, संमेलनाचे सुरेंद्र गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. ११ वा. प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी लिखित ‘अक्षरनोंदी’ या समिक्षा ग्रंथाने प्रकाशन, शांतिनाथ मांगले यांचे कथाकथन होणार आहे.
दुपारी १२ ते दीड या वेळेमध्ये कविसंमेलन होणार असून, या कवी संमेलनामध्ये सुरेखा धनवडे, तेजश्री पाटील, प्रदीपकुमार भांदिर्गे, रंजना नागरगोजे, सचिन सूर्यवंशी, अंकुश चव्हाण, महेश गोरे, किरण अहिवळे, शिवप्रसाद पवार, क्षितीज तांबवेकर, संजय जगताप, अंजली देशपांडे, प्रा. सिद्धेश्वर सपकाळ, काजल शिंदे हे कवी सहभागी होणार आहेत. प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर हे सूत्रसंचलन तर, अध्यक्ष म्हणून थळेंद्र लोखंडे काम पाहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचीव सुधाकर कुबेर आहेत. यावेळी ग्रंथ प्रदर्शन व विक्री होणार असल्याची माहिती प्रा. शिवशंकर माळी, डॉ. शौकतअली सय्यद व अमोल गरवारे यांनी
दिली. (वार्ताहर)