जुन्या भांडणातून एकावर कोयत्याने वार; सातजणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:27 PM2023-06-15T15:27:03+5:302023-06-15T15:27:19+5:30

पोलिसांनी संशयितांना अटक केली

From an old quarrel one is stabbed with a spear, Crime against seven persons in karad satara | जुन्या भांडणातून एकावर कोयत्याने वार; सातजणांवर गुन्हा

जुन्या भांडणातून एकावर कोयत्याने वार; सातजणांवर गुन्हा

googlenewsNext

कऱ्हाड : जुन्या भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण करत कोयत्याने वार केल्याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकजण अल्पवयीन असून, पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला. वारुंजी, ता. कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलसमोर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अजय विजय सावंत (२३, रा. शनिवार पेठ, कराड) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून शशांक जालिंदर होगाडे (२९), रोहित मारुती होगाडे (३०), आकाश राजू वाघमारे (२२), शुभम गोपाळ साळुंखे (२१), विनायक विवेकानंद होगाडे (३०, सर्व रा. शनिवार पेठ, कराड), यासर ऊर्फ सोन्या कादर शिकलगार ( २२, रा. मलकापूर, कराड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारुंजी येथील सह्याद्री हॉस्पिटलसमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित हातात कोयता व लाकडी दांडके घेऊन मोटारसायकलवरून आले. तेथे त्यांनी अजय सावंत व अविनाश कांबळे यांना थांबवून शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी शशी होगाडे याने अविनाश कांबळे याच्या कानाखाली मारून ‘यांना लय मस्ती आली आहे, मारा यांना’ असे सांगितले. त्यामुळे विनायक होगाडे, सोन्या शिकलगार, शुभम साळुंखे, अक्षय वाघमारे व अल्पवयीन मुलाने दांडक्याने अविनाश यास मारहाण करण्यास सुरुवात केली. 

त्यावेळी अजय सावंत सोडवण्यास गेला असता शशी होगाडे व रोहित होगाडे यांनी कोयत्याने सावंत यांच्या डोक्यात, पायावर खांद्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पी. एस. जाधव करत तपास करीत आहेत.

Web Title: From an old quarrel one is stabbed with a spear, Crime against seven persons in karad satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.