फलटणमध्ये ओबीसींच्या अन्यायाविरोधात सातारा जिल्हा ओबीसी संघटनेतर्फे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 07:05 PM2017-11-08T19:05:34+5:302017-11-08T19:11:42+5:30

ओबीसींवरील अन्यायाचा विरोधात सातारा जिल्हा ओबीसी संघटना आणि समविचारी संघटनांच्या वतीने मोर्चा काढून फलटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

In front of the Satara District OBC Sanghatan organized by the Satara District | फलटणमध्ये ओबीसींच्या अन्यायाविरोधात सातारा जिल्हा ओबीसी संघटनेतर्फे मोर्चा

ओबीसींवरील अन्यायाचा विरोधात सातारा जिल्हा ओबीसी संघटना आणि समविचारी संघटनांच्या वतीने मोर्चा काढून फलटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देओबीसीसाठी आरक्षण लागू करण्यासाठी मागण्याचे निवेदन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुप्षहारफलटण तहसीलदार यांना मोर्चाने निवेदन

फलटण, दि. ८ : राज्यातील भाजपा सरकारने सत्तेवर आल्यापासून ओबीसींना दिल्या जाणाऱ्या  सोयी, सवलती आणि आरक्षण विविध मार्गांने कमी करून ते संपवून टाकण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. त्याचा फटका विविध क्षेत्रांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या  तरुणांना बसत आहे. या ओबीसींवरील अन्यायाचा विरोधात सातारा जिल्हा ओबीसी संघटना आणि समविचारी संघटनांच्या वतीने मोर्चा काढून फलटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.


या निवेदनात शिक्षण व शासकीय नोकऱ्यामध्ये ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, आरक्षण पदोन्नतीमध्ये लागू करावे, ओबीसी समाजाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी जिल्हा स्तरावर निवासी शाळांची स्थापना करण्यात यावी, शासकीय ओबीसी वसतिगृह सुरू करावी, सहकार क्षेत्रात ओबीसी आरक्षण लागू करावे, स्थानिक स्वराज्य संस्था याप्रमाणे लोकसभा, विधानसभेसाठी ओबीसींना स्वतंत्र्य मतदारसंघ ठेवावेत, ओबीसी भूमिहिनांना शासकीय जमीन वाटप करावे, खासगी औद्योगिक क्षेत्रात ओबीसीसाठी आरक्षण लागू करावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.


यावेळी सातारा जिल्हा ओबीसी संघटना जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दशरथ फुले, फलटण तालुका अखिल भारतीय माळी समाज महासंघ तालुकाध्यक्ष अरविंद राऊत, प्रकाश भोंगळे, प्रमोद क्षीरसागर, भिकाजी सूर्यवंशी, सावता बनकर, राजेंद्र भागवत, रुपेश नाळे, कोंडिबा राऊत, जयसिंग नाळे, बंडू अहिवळे, किशोर सरगर, प्रल्हाद शिंदे, राजकुमार देशमाने, सूर्यकांत घनवट, मंगेश वेदपाठक, सामाजिक कार्यकर्ते अमिरखान मेटकरी, भगवान कर्वे, प्रकाश चोरमले, मनोज आडके, दीपक शिंदे, ज्योतिराम घनवट, नीलेश चिंचकर, बंडू शिंदे, उद्धव बोराटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुप्षहार घालून मोर्चाने निवेदन देण्यात आले.

Web Title: In front of the Satara District OBC Sanghatan organized by the Satara District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.