यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर निर्भया पोलीस चौकीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 04:54 PM2019-02-06T16:54:20+5:302019-02-06T16:57:39+5:30
समाजात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची आहे. त्यामुळे तरुणाईवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्या माध्यमातून तरुणाईला गैरवर्तनाची शिक्षा समजवणं गरजेचं आहे. सामाजिक जाणिवेतून संवेदशील सातारकरांनी उभारलेली निर्भया पोलीस चौकीपेक्षाही निर्भय वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे मत विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.
सातारा : समाजात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची आहे. त्यामुळे तरुणाईवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्या माध्यमातून तरुणाईला गैरवर्तनाची शिक्षा समजवणं गरजेचं आहे. सामाजिक जाणिवेतून संवेदशील सातारकरांनी उभारलेली निर्भया पोलीस चौकीपेक्षाही निर्भय वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे मत विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात निर्भया पोलीस चौकीचे उद्घाटन विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, धीरज पाटील, समीर शेख, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर उपस्थित होते.
नांगरे-पाटील म्हणाले, सरसकट तरुणाईला नावं ठेवण्यात अर्थ नाही. तरुणांची एनर्जी योग्य ठिकाणी उपयोगाला आणण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. एखादा छोटासा वाटणारा गुन्हादेखील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरू शकतो. त्यामुळे भविष्यातील अनेक चांगल्या संधी गमावण्याची वेळही एखाद्यावर येऊ शकते.
देशभरात कुठंही घडलेल्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड एका क्लिकवर असल्याने तरुणाईला याचं भान देणं गरजेचं आहे. हे भान देण्यासाठी पोलिसांबरोबरच महाविद्यालयानेही पुढाकार घेऊन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न होेणे गरजेचे आहेत.