कारखान्यांकडून एफआरपीची तुकडेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:36 AM2020-01-22T00:36:22+5:302020-01-22T00:37:52+5:30
महाराष्ट्रातील नगदी पीक आणि हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून ‘ऊस’ या पिकाकडे पाहिले जाते. साताऱ्यात नीरा, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना आदी नदी व त्यांवर उभारलेल्या धरणांमुळे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यात इतर पिकांचे उत्पादन घेतले जात असले तरी ऊस पिकाला प्राधान्य दिले जाते.
स्वप्नील शिंदे ।
सातारा : साखर उद्योग अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे बुडीत ऊस काढण्याची गरज आहे, असे सांगून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न करता कारखाने सुरू केले. दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना कारखान्यांकडून एफआरपीचे तुकडे केले जात आहेत.
महाराष्ट्रातील नगदी पीक आणि हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून ‘ऊस’ या पिकाकडे पाहिले जाते. साताऱ्यात नीरा, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना आदी नदी व त्यांवर उभारलेल्या धरणांमुळे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यात इतर पिकांचे उत्पादन घेतले जात असले तरी ऊस पिकाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस शेतीसोबत साखर कारखानदारी उभी राहिली. त्यामुळेच येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठी मदत झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंगाम नोव्हेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. हळूहळू जिल्ह्यातील सर्वच सहकारी व खासगी कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले. जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखानांच्या ऊसतोडणी यंत्रणा सध्या जोरात सुरू आहेत.
बहुतांश साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. कायद्यानुसार कारखान्यांनी ऊस गाळपाला नेल्यापासून १४ दिवसांच्या आत उसाच्या एफआरपीची रक्कम ही शेतकºयांच्या खात्यात जमा करणे कारखान्यांसाठी बंधनकारक असते. मात्र, एक-दोन कारखाने सोडले तर इतर कारखान्यांनी उसाच्या एफआरपीबाबत निर्णय घेतलेला दिसत नाही. फलटणचा श्रीराम, साखरवाडीचा श्रीदत्त, कºहाडातील रयत, सह्याद्री आणि कृष्णा कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली. मात्र, इतर कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप सुरू केले.
साखर उद्योग अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे बुडीत ऊस काढण्याची गरज आहे, असे सांगून उसाचा दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केले. मात्र, दर जाहीर न करता आणि एफआरपीचे तुकडे पाडले जात आहेत. महापूर आणि अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यात ऊसतोडणी यंत्रणेकडून पैशांची मागणी केली जात आहे. एकीकडे उत्पादनात घट, तोडणी खर्चात वाढ आणि एफआरपी मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे.
- कारखान्यांकडून गतवर्षीची देणी बाकी...
गतवर्षीच्या गळीत हंगामामध्ये सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपी व दोनशे रुपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र, अजून अनेक कारखान्यांची २०० ते ५०० रुपयांपर्यंतची देणी बाकी आहेत. ती तातडीने मिळावी, अशी मागणी होत आहे.
अनेक अडचणींवर मात करीत कारखानदार हा गळीत हंगाम करीत आहेत. त्यात दराची स्पर्धा, गाळपाची स्पर्धा, रिकव्हरीची स्पर्धा पाहायला मिळते. इतर कारखाने गेटकेनद्वारे ऊस पळवत आहेत. त्यामुळे यंदा गळीत हंगाम कमी दिवस होणार आहे. जाहीर केलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असे कारखान्याच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
गाळप सुरू होण्यापूर्वी कारखान्यांच्यावतीने एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र, गाळप सुरू केल्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घ्यालावे.
- धनंजय महामुलकर,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
- कारखान्याचे नाव गळीत गळीत साखर रिकव्हरी
दिवस मेट्रिक टन उत्पादन
यशवंतराव मोहिते कृष्णा ४४ ३५३८०० ४२२६३० ११.८४
कारखाना लि. रेठरे बुद्रुक
सह्याद्री कारखाना यशवंतनगर ४२ ३४६१०० ४०५८०० ११.६४
किसनवीर कारखाना, भुर्इंज २५ ९८१०० ९७९२० १०.५४
जयवंत शुगर, धावरवाडी ४३ १८७६४५ २०४३०० १२.३१
अजिंक्यतारा, शेंद्रे ४२ १७५५९० १९३१६० ११.२४
बाळासाहेब देसाई कारखाना, मरळी ४२ ६६७१० ७४३०० ११.१५
श्रीराम सहकारी, फलटण ४७ १२९७३४ १३४६०० १०.५७
न्यू फलटण शुगर, साखरवाडी ३५ ८८६७९ ९१४५० १०.९२
जरंडेश्वर कारखाना, कोरेगाव ४० ३२९४३० ३७९८०० ११.२५
ग्रीन पावर शुगर, गोपूज ४३ १६५४५० १८२४०० ११.१०
अथणी शुगर्स (रयत) शेवाळेवाडी ४१ ९४४०० १०८०२५ ११.८१