फळ विक्रेत्याला तडीपार गुंडाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:37+5:302021-05-25T04:44:37+5:30
सातारा : फळ घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने चिडून जाऊन तडीपार गुंड व त्याच्या साथीदारांनी फळ विक्रेत्याला बेदम मारहाण केली. ...
सातारा : फळ घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने चिडून जाऊन तडीपार गुंड व त्याच्या साथीदारांनी फळ विक्रेत्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पिल्या राजू नलवडे (रा. मंगळवार पेठ बोगदा परिसर, सातारा) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पिल्या नलवडे याला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तडीपार केले असतानाही गोंधळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिल्या नलवडे व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी रहिमान राजू बागवान (वय ३४, रा. मंगळवार पेठ) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही घटना २३ रोजी घडली. तक्रारदार बागवान यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. संशयितांनी बागवान यांच्याकडून फळे घेतल्यानंतर त्यांनी त्याचे पैसे मागितले. यावरून चिडून जाऊन संशयितांनी लाकडी दांडके, दगडाने मारहाण केली. या सर्व घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संशयितांनी तक्रारदार यांना मारहाण केल्यानंतर तेथून ते पसार झाले. या घटनेत तक्रारदार जखमी झाले असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.