सातारा-पुसेसावळीत नागरिकांना कशाची भीतीच नाही ;कारण ते असे फिरताहेत खुलेआम रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 04:36 PM2020-04-24T16:36:55+5:302020-04-24T16:38:45+5:30

सातारा जिल्ह्यात सध्या 21 रुग्ण आढळले असून त्यातील बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.प्रशासन वारंवार घरी रहा सुरक्षित रहा अशा प्रकारच्या सूचना देत आहे परंतु कोणीही गांभीर्याने घेत नाही

Fudge of social distance in Pusesavali | सातारा-पुसेसावळीत नागरिकांना कशाची भीतीच नाही ;कारण ते असे फिरताहेत खुलेआम रस्त्यावर

सातारा-पुसेसावळीत नागरिकांना कशाची भीतीच नाही ;कारण ते असे फिरताहेत खुलेआम रस्त्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जाया दुकानदारावर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पुसेसावळी (सातारा) :सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. त्यात कोरोनाच्या खबरदारी साठी गावे सील करण्यात येत आहेत. परंतु पुसेसावळी ता. खटाव येथे मात्र कोरोनाची कोनालाही भीती नसल्याचे दिसतआहे. सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवून व्यवहार सुरू केल्याने पुसेसावळीला पुन्हा बाजाराच्या गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले आहे

सातारा जिल्ह्यात सध्या 21 रुग्ण आढळले असून त्यातील बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.प्रशासन वारंवार घरी रहा सुरक्षित रहा अशा प्रकारच्या सूचना देत आहे परंतु कोणीही गांभीर्याने घेत नाही. अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदीत काहीजण या गावातून त्या गावात वावरताना दिसून येत आहेत.

त्याच बरोबर सोशल डिस्टन्सला केराची टोपली दाखवत काहीजण गावातील काही ठिकाणी गप्पा मारणे, क्रिकेट खेळणे असले उद्योग पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे अशा गांभीर्य नसणाऱ्या लोकांवर स्थानिक प्रशासन व पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहेत.

लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यकसेवा सुरु ठेवलेली आहे यामध्ये किराणा दुकान, औषधे, दुध, स्वस्त धान्य दुकान आदींना मान्यता दिली आहे. पण या अत्यावश्यक सेवेबरोबरच मान्यता नसलेले अनेक दुकाने उघडी असल्याचे दिसत आहेत. ज्या वस्तूंचे व्यवहार करु नयेत असे प्रशासनाने सांगितले आहे. तेच व्यवसाय उघडपणे सुरु आहेत.त्यामुळे

 

Web Title: Fudge of social distance in Pusesavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.