इंधन बचत काळाची गरज : गावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:21+5:302021-01-20T04:37:21+5:30
फलटण : ‘इंधन बचत काळाची गरज आहे. चालकांनी इंधन बचतीद्वारे देशाच्या प्रगतीला हातभार लावावा,’ असे प्रतिपादन पुणे उपप्रादेशिक ...
फलटण : ‘इंधन बचत काळाची गरज आहे. चालकांनी इंधन बचतीद्वारे देशाच्या प्रगतीला हातभार लावावा,’ असे प्रतिपादन पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजीराव गावडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या फलटण आगारात इंधन बचत मासिक उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अप्पा टेंबरे, लक्ष्मण बुधनवर, आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक राहुल कुंभार, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय महानवर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, प्रशिक्षणार्थी वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, वरिष्ठ लिपिक लहू चोरमले यांच्यासह चालक, वाहक आणि कर्मचारी उपस्थित होते.
अप्पा टेंबरे, लक्ष्मण बुधनवर यांनी इंधन बचतीबाबत मार्गदर्शन केले. आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांनी प्रास्तविकात इंधन बचत मासिक उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना चालकांना वाहतूक विषयक नियमांचे पालन करण्याचे व डिझेल बचत करण्याचे आवाहन केले. श्रीपाल जैन यांनी आभार मानले.