भांबवलीच्या कुशीतील ‘फुलोत्सव’ फेडतोय डोळ्यांचे पारणे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:36 PM2019-01-29T23:36:32+5:302019-01-29T23:36:36+5:30

सातारा : देशात सर्वात उंच असलेला भांबवलीचा धबधबा पावसाळा सुरू होताच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो. हा जलप्रपात जसा प्रसिद्ध ...

'FULOTSOVE' festive eyes of Bhambavli Kushi. | भांबवलीच्या कुशीतील ‘फुलोत्सव’ फेडतोय डोळ्यांचे पारणे..

भांबवलीच्या कुशीतील ‘फुलोत्सव’ फेडतोय डोळ्यांचे पारणे..

Next

सातारा : देशात सर्वात उंच असलेला भांबवलीचा धबधबा पावसाळा सुरू होताच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो. हा जलप्रपात जसा प्रसिद्ध आहे, तसाच हिरव्यागार डोंगरांगांच्या कुशीत फुलणाऱ्या रानफुलांचा रंगोत्सवही डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. सध्या भांबवलीजवळ अशी अनेक रानफुले उमलली असून, हा फुलोत्सव सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
भारतातील सर्वात उंच असलेल्या धबधब्यांपैकी भांबवली-वजराईचा धबधबा सर्वात उंच असून, याची उंची सुमारे ५६० मीटर इतकी आहे. पावसाळ्यात हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये कोसळतो. कास पठरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेला निसर्गाचा हा अद्भूत अविष्कार पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतो. भांबवली परिसरात निरव शांतता असून, बारमाही गार वारा असतो. या ठिकाणाहून उरमोडी जलाशय, शिवसागर (कोयना) जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगडाचे विलोभनीय दृश्य नजरेस पडते.
भांबवलीच्या जंगलात अनेक वन्यजीवांचा अधिवास असून, फुलपाखरे, विविध प्रकारची औषधी झाडे येथे नेहमीच दृष्टिक्षेपात पडतात. निसर्गाचे वरदान लाभलेला भांबवलीचा परिरसर जंगली फुलांसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. सध्या या परिसरात गुलाबी, राखाडी, लाल, हिरव्या, पिवळ्या, जांभळ्या व पांढºया रंगाची रानफुले मोठ्या प्रमाणात बहरली असून, हा फुलोत्सव स्थानिकांसह या परिसराला भेट देणाºया पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. अस्सल जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले भांबवलीकडे वळू लागली आहेत.
भांबवली पठाराकडे दुर्लक्ष
भांबवली पुष्प पठार हे सातारा, जावळी व पाटण तालुक्यापर्यंत पसरले आहे. त्याचा विस्तार खूप मोठा असून, त्याची मोजणी झालेली नाही. या पठारावर दुर्मीळ फुले बहरतात; पण संशोधकांनी भांबवलीसारखे सर्वात मोठ्या पुष्प पठाराकडे लक्ष गेले नाही.

Web Title: 'FULOTSOVE' festive eyes of Bhambavli Kushi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.