आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव संकुलाला निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:13 PM2018-10-05T23:13:08+5:302018-10-05T23:13:12+5:30
कºहाड : आॅलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या नावाने सातारा जिल्ह्यातील कºहाड तालुक्यातील गोळेश्वर येथील त्यांच्या जन्मगावी कुस्ती संकुल उभारण्यात येणार आहे. संकुलासाठी शुक्रवारी ग्रामपंचायतीकडून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे जागा सुपूर्द करण्यात आली. या ठिकाणी १ कोटी ५७ लाख रुपये निधीतून भव्य असे कुस्ती संकुल होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडा संकुल समिती सचिव राजेंद्र ततनूर, वास्तू विशारद सारंग बेलापुरे, आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव
यांचे नातू नीलेश जाधव, अमरजित जाधव, गोळेश्वरच्या सरपंच राणी जाधव, उपसरपंच प्रदीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य अभिजित झिमरे, संजय जाधव, हिंमतराव जाधव, ग्रामविकास अधिकारी
विकास जगताप, मंडलाधिकारी जयराम बोडके, तलाठी प्रशांत कोळी उपस्थित होते.
यावेळी युवराज नाईक म्हणाले, ‘गोळेश्वर येथे उभारण्यात
येणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव क्रीडा संकुलासाठी राज्य सरकारकडून १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी एक कोटींचा निधी तालुका क्रीडा संकुलाच्या नावे वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित ५७ लाखांचा निधी संकुलाचे काम सुरू झाल्यानंतर वर्ग होणार आहे. या संकुलाच्या कामाबाबत संकुल समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ट दर्जाचे व उत्तम पैलवान तयार होतील असे कुस्ती संकुल जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी उभारले जाणार आहे. या संकुलात शासनाच्या अकरा प्रकारच्या विविध योजनांतून सुविधा
उभारण्यात येतील.’
दरम्यान, शुक्रवारी दुपारी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांनी कुस्ती संकुल उभारण्यात येणाºया जागेची
पाहणीही केली. यावेळी गोळेश्वर परिसरातील नागरिकांसह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासन नियुक्त क्रीडा मार्गदर्शक
गोळेश्वरमध्ये कुस्ती संकुल निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान तयार व्हावेत, यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शकांची मागणी करून पैलवानांसाठी शासन नियुक्त क्रीडा मार्गदर्शक व वस्तादांची नियुक्ती केली जाईल. याबाबत लवकरच बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.