लिंबच्या विकासासाठी उदयनराजेंकडून १५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:40 AM2021-04-21T04:40:00+5:302021-04-21T04:40:00+5:30

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत समाजकारण केले आहे. लिंब गावातील रस्त्याच्या ...

Fund of Rs. 15 lakhs from Udayan Raje for the development of Limb | लिंबच्या विकासासाठी उदयनराजेंकडून १५ लाखांचा निधी

लिंबच्या विकासासाठी उदयनराजेंकडून १५ लाखांचा निधी

Next

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत समाजकारण केले आहे. लिंब गावातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी त्यांनी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने रस्त्याचे काम मार्गी लागले असून आतापर्यंत खासदार उदयनराजे भोसले यांनी गावातील विकासकामांसाठी ७० लाख रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांनी दिली.

लिंब गावातील रस्त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या खासदार फंडातून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ सरपंच ॲड. अनिल सोनमळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी गोसावी बोलत होते.

बाळासाहेब गोसावी पुढे म्हणाले, मोठे गाव असल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यकर्ते गावात असतात. हीच खरी लोकशाही आहे. मात्र, जेव्हा गावाच्या विकासाची गोष्ट येते तेव्हा राजकीय, वैचारिक मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येणे यातूनच विकास घडत असतो. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राजकारणापलीकडे जाऊन गावासाठी आतापर्यंत ७० लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला आहे.

यावेळी उमेश पाटील, राहुल पाटील, संदीप सोनमळे, अशोक करंजे, दीपक शिंदे, अमित पाटील, राजेश शेटे, जीवन सोनमळे, दत्ता वणवे, संतोष सावंत, विशाल राजे, दिलीप सावंत, सुरेश जाधव, लहू सावंत, सुनील जमदाडे, सुरेश सावंत, तुळशीराम सावंत, योगेश सोनमळे, दिलीप वंजारी, लक्ष्मण मापारी, रवींद्र काबंळे, कीर्तिकुमार तारू, हणमंत करंजे, नाना निकम, दत्ता गिरी, बाबू खादगे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ - लिंब, ता. सातारा येथे रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी सरपंच ॲड. अनिल सोनमळे, बाळासाहेब गोसावी व ग्रामस्थ, कार्यकर्ते.

Web Title: Fund of Rs. 15 lakhs from Udayan Raje for the development of Limb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.