पुसेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:34+5:302021-03-15T04:34:34+5:30

पुसेगाव : ‘खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठी बाजारपेठ असल्याने पुसेगावात विकासकामांना गती देण्यासाठी भरघोस निधीची तरतूद आहे,’ ग्वाही आमदार ...

Funds for the development of Pusegaon will not be reduced | पुसेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

पुसेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

googlenewsNext

पुसेगाव : ‘खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठी बाजारपेठ असल्याने पुसेगावात विकासकामांना गती देण्यासाठी भरघोस निधीची तरतूद आहे,’ ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.

पुसेगाव (ता. खटाव) येथील नागरिकांसाठी अत्यंत अडचणीच्या असलेल्या दोन अंतर्गत रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवस्थान ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त व जनशक्ती संघटनेचे प्रमुख रणधीर जाधव, माजी चेअरमन सुनीलशेठ जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, विसापूरचे हरी सावंत, नेरचे सरपंच सुरेश चव्हाण, प्रा. टी. एन. जाधव, प्रा. ए. डी. जाधव, प्रा. केशव जाधव, अंकुश पाटील, सूरज जाधव, रोहन देशमुख, सुसेन जाधव, मोहन जाधव, बाबू जाधव, दिलीप देशमुख, पी. डी. जाधव, विनायक जाधव, नंदकुमार जोशी, राम जाधव, जीवन जाधव, श्रीकांत पवार, डॉ. महेश भिसे, दिलीप उनउने, घनश्याम मसणे, दीपक तोडकर, अमर खटावकर, सुशील जाधव, संदीप कट्टे, कुमार जाधव, विजय सावंत, गोट्या जाधव, अविनाश जाधव, नीलेश जाधव, ओंकार जाधव, चेतन जाधव यांच्यासह जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुसेगावातील जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्टऑफिस, सोसायटी तसेच वीज वितरण कंपनीचे कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने नेहमी ग्राहकांच्या वर्दळीने बाचल गिरणीच्या पुढील रस्ता ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी अडचणीचा ठरला होता. गत सहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, रस्त्यालगत असलेल्या गटारांच्या उंचीपेक्षा रस्ता सुमारे दोन ते तीन फूट उंच असल्याने कित्येकदा या ठिकाणी अपघात घडले होते. पुसेगावच्या उत्तरेला नव्याने झालेल्या वसाहतीतील नागरिकांसाठी हाच रस्ता असल्याने या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते; परंतु या रस्त्यावरील लेंढोरी ओढ्यावर असलेल्या पुलाला मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने या पुलाची दुरुस्ती न होता नवीन पूल व्हावा, अशी मागणी रणधीर जाधव यांनी करताच आमदार महेश शिंदे यांनी या पुलाच्या नवीन बांधकामासाठी निधीची तरतूद करण्याची तसेच नाबार्डचे ही सहकार्य या पुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.

१४पुसेगाव

फोटो कॅप्शन :

जिल्हा मध्यवर्ती बँक ते लेंढोरी ओढा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन सुनीलशेठ जाधव, आमदार महेश शिंदे, रणधीर जाधव आदी उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)

Web Title: Funds for the development of Pusegaon will not be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.