गावठी पिस्टल घेऊन हे युवक फिरत होते; काय होता त्यांचा प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 08:07 PM2019-07-12T20:07:27+5:302019-07-12T20:09:30+5:30

वाटकर याच्याकडून केवळ सहा दिवसांपूर्वी पिस्टल जप्त केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ओळखले.

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या युवकासह दोघांना अटक | गावठी पिस्टल घेऊन हे युवक फिरत होते; काय होता त्यांचा प्लॅन

गावठी पिस्टल घेऊन हे युवक फिरत होते; काय होता त्यांचा प्लॅन

Next
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : एक लाख ३६ हजारांचा ऐवज जप्तकºहाड तालुका पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल

सातारा : कोपर्डे हवेली, ता. कºहाड येथे संशयितरित्या फिरणाºया युवकाकडून गावठी पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पिस्टल देण्याºया युवकालाही पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास केली.
धनंजय मारुती वाटकर (वय २१, रा. विद्यानगर सैदापूर, ता. कºहाड), गणेश उर्फ सनी सुनील शिंदे (रा. ओगलेवाडी पोलीस चौकी शेजारी, कºहाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड हे आपल्या टीमसह कºहाड तालुका परिसरामध्ये गुरुवारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी कोपर्डे हवेली येथील रेल्वे गेटच्या बाजूस धनंजय वाटकर एका दुचाकी गाडीजवळ उभा असल्याचे दिसले.

वाटकर याच्याकडून केवळ सहा दिवसांपूर्वी पिस्टल जप्त केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ओळखले. त्याच्याजवळ जाऊन पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे सापडली. ह्यहे पिस्टल कोठून आणले,याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र सनी शिंदे याच्याकडून हे पिस्टल आणले असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सनी शिंदे याच्या घरी जाऊन त्याला अटक केली. स्वत:च्या संक्षरणाठी मी हे पिस्टल बाळगल्याचे वाटकर याने पोलिसांना सांगितले.
वाटकर आणि शिंदे या दोघांकडून एक दुचाकी, रोकडसह एक लाख ३६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या दोघांवर कºहाड तालुका पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, हवालदार सुधीर बनकर, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, अर्जून शिरतोडे, प्रमोद सावंत, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.
 


 

Web Title: गावठी पिस्टल बाळगणाऱ्या युवकासह दोघांना अटक

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.