गडहिंग्लज पालिकेवर धडक

By admin | Published: December 23, 2014 09:14 PM2014-12-23T21:14:17+5:302014-12-23T23:48:23+5:30

रस्त्यावरील विक्री बंद करा : मंडईतील भाजी विक्रेत्यांचे आंदोलन

Gadhingj | गडहिंग्लज पालिकेवर धडक

गडहिंग्लज पालिकेवर धडक

Next

गडहिंग्लज : मंडईतील भाजी विक्रेत्यांनी गडहिंग्लज पालिकेवर धडक मारली. लक्ष्मी रोडसह शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरील भाजी विक्री बंद करावी, अन्यथा शुक्रवार (दि. २६) पासून शहरातील भाजी विक्री बेमुदत बंद करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखालील मंडईतील भाजी विक्रेत्यांनी पालिकेवर धडक मारली. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे व उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आणि निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, लक्ष्मी रोडवरील भाजी विक्रेत्यांना भडगाव रोडवरील मंडईत हलविण्यात आले. त्यावेळी लक्ष्मी रोडवरील भाजी विक्री बंद करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
दरम्यान, काही व्यापारी व शेतकरी लक्ष्मी रोडसह शहरातील ठिकठिकाणी दुकान थाटून भाजी विक्री करीत आहेत. त्यामुळे मंडईतील भाजी विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. याबाबत तोंडी व लेखी अनेकदा कळवूनही त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे.
दोन दिवसांत मंडईबाहेरील शहरातील भाजी विक्री बंद न केल्यास व्यवसाय बंद ठेवून सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
शिष्टमंडळात अमोल हातरोटे, शेखर चिंचेवाडी, मुस्ताक खलिफ, सदाशिव अळगुंडे, सूरज चौगुले, राहुल नेवडे, लीलाबाई देसाई, विमल दळवी, शोभा कांबळे, शिवानंद जिनगी, लता चौगुले, मल्लाप्पा चनबसण्णावर, अमर नेवडे, आप्पासाहेब खानाई, आदींसह भाजी विक्रेत्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)


दोन दिवसांत कारवाई
मंडईबाहेर भाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईसाठी नगरपालिकेचे खास पथक नेमण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी भाजी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाला यावेळी दिली.

Web Title: Gadhingj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.