जनावरे चोरणारी फलटणची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:30 AM2019-08-24T10:30:47+5:302019-08-24T10:32:03+5:30
फलटण तालुक्यामध्ये जनावरे चोरणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांनी जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एक गाय आणि वासरू ताब्यात घेऊन मालकाच्या स्वाधीन करण्यात आले.
सातारा : फलटण तालुक्यामध्ये जनावरे चोरणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांनी जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एक गाय आणि वासरू ताब्यात घेऊन मालकाच्या स्वाधीन करण्यात आले.
सचिन लक्ष्मण बुरुंगले (वय ३०), नितीन लक्ष्मण बुरुंगले (वय २५), विकास महादेव चोपडे (वय ४५), तुकाराम शिवाजी पांढरे (वय ४२, सर्व रा. राजाळे, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण तालुक्यातील बुरुंगेवस्ती येथील काहीजणांनी एक गाय व वासरू चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वरील चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी घराच्या आडोशाला जनावरे बांधून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन एक गाय व वासरू यांची सुटका करून मालकाच्या ताब्यात दिले. संबंधित चौघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतीराम बर्गे, विनोद गायकवाड, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, धीरज महाडिक आदींनी सहभाग घेतला.