धनगर समाजाचे गजीनृत्य आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:00 PM2018-08-28T23:00:59+5:302018-08-28T23:01:03+5:30
कºहाड : आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी करावी, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, धनगड ऐवजी धनगर असा उल्लेख करावा, आदी मागण्यांसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर गजीनृत्य करत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी समाजबांधवांच्या वतीने तहसीलदार राजेंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिले. आक्रमक झालेल्या धनगर समाजबांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपवर हल्लाबोल करीत येथील कोल्हापूर नाक्यापासून दत्त चौकमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ‘एक धनगर कोट धनगर, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, येळकोट येळकोट जय मल्हार, धनगड दाखवा नाहीतर शिफारस पाठवा, एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे,’ अशा गगनभेदी घोषणा देत मंगळवारी धनगर समाजबांधवांनी कºहाडात मोर्चा काढला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव व महिलाही सहभागी झाल्या होत्या.
धनगर ऐवजी धनगड जात निर्माण करून केंद्रशासनाला खोटी माहिती दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचा तर बारामती येथे धनगर समाज बांधवांनी जेव्हा मोर्चा काढला तेव्हा आम्ही सत्तेवर आल्यावर पहिल्या बैठकीत आरक्षणाचा प्रश्न निकाली लावू म्हणणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन न पाळल्याबद्दल त्यांचाही तीव्र निषेध समाजबांधवांनी नोंदविला.
यावेळी धनगर समाजबांधव येथील कोल्हापूर नाक्यापासून दत्तचौक याठिकाणी आले. येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या ठिकाणी समाजबांधवांनी गजीनृत्य केले. त्यानंतर पुन्हा समाजबांधव तालुका पोलीस स्टेशनमार्गे भेदा चौकातून तहसील कार्यालय येथे गेले.
यावेळी आॅल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शिवाजीराव गावडे, रमेश लवटे, भाऊसाहेब देवे, नितीन पुकळे, जयश्री लाडे, मंगल गलांडे, भगवान येडगे, आबासाहेब गावडे, राम
झोरे, विलास पोळ, तेजस्विनी
मेटकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
येळकोट येळकोट जय मल्हार.....
कºहाड येथे आरक्षण मागणीसाठी काढलेल्या मोर्चाच धनगर समाजातील काही समाजबांधव त्यांच्या मूळच्या पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. कपाळाला भंडारा लावून येळकोट येळकोट जय मल्हार... असा जयघोष करीत शहरातून समाजबांधवांनी ढोल वाजवत व गजीनृत्य करीत कोल्हापूर नाक्यापासून मोर्चास सुरुवात केली.
७२ वर्षांपासून
प्रलंबित प्रश्न...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत धनगर समाजाला आरक्षण दिले आहे. फक्त त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करणे आवश्यक आहे. ही मागणी गेली ७२ वर्षांपासून समाजाची आहे. या मागणीसाठी मंगळवारी धनगर समाजबांधवांनी कºहाडात गजीनृत्य करीत मोर्चा काढला.